अकोला : कच्छी मेमन समाजातील गरीब आणि भाड्याच्या घरात राहणाऱ्या अकोल्यातील गरजवंत ३१ निराधार कुटुंबीयांना हक्काचे घर नि:शुल्क बांधून दिले आहे. अकोला कच्छी मेमन समाज जमात, वेल्फेअर मेमन आणि वर्ल्ड मेमन आॅर्गनायझेशनच्या संयुक्त विद्यमाने रक्कम गोळा करून हा सामाजिक उपक्रम राबविला. तयार झालेल्या या घरांच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम नुकताच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत अकोल्यात पार पडला.अकोट रोडवर या प्रकल्प उभारणीला दीड वर्षाआधीच सुरुवात झाली होती. दरम्यान, देश-विदेशातील दानशूर समाज बांधवांची प्रतीक्षा होत होती. या सर्व मंडळींचा गोतावळा अकोल्यात आल्यानंतर ३१ गरजवंतांच्या हवाली ही इमारत देण्यात आली. मागील रविवारी हस्तांतरण झालेल्या या सोहळ्यास वर्ल्ड मेमन आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष हारूण अब्दुल करीम, वर्ल्ड मेमन आॅर्ग. चे अध्यक्ष हाजी अब्दुल मजीद रानानी, वर्ल्ड मेमन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्रीलंका येथील रहिवासी अशरफ अब्दुल सत्तार, मेमन वुमन विंगच्या दुबई येथील रहिवासी नसीमबाई अब्दुल मजीद रानानी, वर्ल्ड मेमन आॅर्ग.चे राष्ट्रीय उपाध्यक्ष एहसानभाई गाडावाला, वर्ल्ड मेमन आॅर्ग.च्या सचिव हसीनबाई अघाडी, अशीफाबाई खत्री, माशेलाबाई नवीवला, रझियाबाई चष्मावाला, नाझियाबाई अफजल पाकिजावाला, हाजी सिद्धिक मोतीवाला, नासिमबाई सुरती, अनास मोशाक, इम्रान फारूक, रफिक ठेकिया, इम्रान अरिफ पल्ला, बिलाल ठेकिया, अकोला कच्ची मेमन जमातीचे अध्यक्ष जावेद जकारिया आदी मान्यवर उपस्थित होते.या मान्यवरांनी मेमन समाजातील गरजू ३१ नागरिकांना आगळ्या-वेगळ्या ड्रॉ पद्धतीने फ्लॅट सिस्टिममध्ये साकारलेल्या घरांच्या चाव्या बहाल केल्या. यावेळी टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. देश-विदेशातून आलेल्या मान्यवरांनी समाजाच्यावतीने इतर जिल्ह्यातही समाजातील गरजू व वंचित नागरिकांसाठी अशी मोफत घरकुल योजना राबवावी, असे आवाहनही येथे करण्यात आले. देश-विदेशातून आलेल्या या मान्यवरांचे शाल, स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. कच्ची मेमन समाजात उल्लेखनीय कार्य करणाºया रफिकभाई ठेकिया, अफजल पाकीजावाला, फारुखभाई, जरीनाबाई ठेकिया, रौफभाई टिक्की, अनिसभाई जानवनी, सलीमभाई सुमार, सीमा शफी सूर्या, सबा जावेद डोकडीया, आरिफ नदानी, परवेज डोकडिया, अबिद चिन्नी, फाहद ठेकिया, जुनेद ठेकिया, जावेद जकारिया, शफी सूर्या यांचा विशेष गौरव करण्यात आला. संचालन अकोला कच्ची मेमन जमातीचे अध्यक्ष जावेद जकारिया यांनी केले. आभार जमातचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष बिलाल ठेकिया यांनी केले.