अकोला : भारतीय खेळ महासंघ भोपाळ यांच्यावतीने सन २०१७-१८ या वर्षामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने विविध खेळांच्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या व प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील ३१ खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा शिष्यवृत्तीचे जाहीर करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीचे वाटप थेट खेळाडूंच्या बँक खात्यात आॅनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम स्थान प्राप्त करणाऱ्या खेळाडूला ११,२५० रुपये, द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्यास ८,९५० रुपये व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या खेळाडूस ६,७५० रुपये व सहभागी खेळाडूस ३,७५० रुपये एवढी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या खेळाडूंनी आपले सहभाग किंवा प्रावीण्य प्राप्त केलेल्या सन २०१७-१८ चे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत, बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स व आधार कार्डची झेरॉक्स ३१ मार्चपूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वसंत देसाई क्रीडांगण, अकोला येथे तातडीने सादर करावी. त्यानंतर खेळाडूंच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात येईल. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी श्याम देशपांडे यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी दिली. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले खेळाडूअमित रामगुळे कबड्डी, नाना पिसाळ बॉक्सिंग, अयुब जानीवाले बॉक्सिंग, राहिल सिद्धीकी बॉक्सिंग, दिव्या बचे बॉक्सिंग, समीर डोईफोडे क्रिकेट, किरण तळे कबड्डी, मयुरी मस्के बेसबॉल, निशांत घोगरे शुटिंग, प्रबल चौखंडे क्रिकेट, सुजल दांदडे रोलबॉल, शिवाजी गेडाम बॉक्सिंग, प्रशिक्ष भालेराव बॉक्सिंग, अजय पेंदोर बॉक्सिंग, साकीब पठाण बॉक्सिंग, साक्षी गायधनी बॉक्सिंग, रेहान ठेकिया क्रिकेट, सय्यद सकलेन अयुब सिकई, कादंबरी खापरे बेसबॉल, चार्मी बगेरे बेसबॉल, इशा सारडा बुद्धिबळ, सोहेल पप्पुवाले बॉक्सिंग, शायवत तिवारी बॉक्सिंग, जिब्रान खान बॉक्सिंग, गौरी जयपुरे बॉक्सिंग, देवानंद शुक्ला वेटलिफ्टिंग, प्रतिज्ञा तेलगोटे कबड्डी, हर्षल मेश्राम व्हॉलीबॉल, रोहित दांदळे हॉकी, अंजली तायडे तायक्वांदो यांचा समावेश आहे.
अकोल्यातील ३१ खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती जाहीर; आॅनलाइन पद्धतीने होणार वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 3:11 PM
अकोला : भारतीय खेळ महासंघ भोपाळ यांच्यावतीने सन २०१७-१८ या वर्षामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने विविध खेळांच्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या व प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील ३१ खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा शिष्यवृत्तीचे जाहीर करण्यात आली आहे.
ठळक मुद्देशिष्यवृत्तीचे वाटप थेट खेळाडूंच्या बँक खात्यात आॅनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम स्थान प्राप्त करणाऱ्या खेळाडूला ११,२५० रुपये.द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्यास ८,९५० रुपये व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या खेळाडूस ६,७५० रुपये.