साहेब माझा अर्ज घ्या अन् निशाणी गाढवच द्या!
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा आज शेवटच्या दिवशी एका ७० वर्षीय वृद्धाने दिवसभर तहसील कार्यालयात प्रत्येक विभागात जाऊन फाइल दाखविली व साहेब माझा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घ्या अन् निशाणी मात्र गाढवच द्या बरं... असे म्हणत प्रत्येक टेबलवर गेला एका व्यक्तीने त्यांना हटकून म्हटले की, तुम्ही अर्ज मागे घ्या. त्यावर हे वृद्ध आजोबा म्हणतात एक लाख रुपये दिले तरी माघार घेणार नाही, जेव्हा काही ग्रामपंचायतच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळले की हे वृद्ध मानसिकदृष्ट्या विकृत आहेत तेव्हा मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
या २७ ग्रामपंचायतींसाठी होणार निवडणूक
मोरगाव काकड, रुस्तमाबाद, सहित, मांगूळ, शिंदखेड, लोहगड, पुनोती बु. (सकनी), वाघा (वस्तापूर), कान्हेरी (सरप), कातखेड खेर्डा बु., महान, दोनद बु,. हातोला, पिंजर, निहिदा (लखमापूर), कोथळी खुर्द, टिटवा सुकळी (वरखेड), झोडग, रहीत या २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून, प्रभारी तहसीलदार संतोष यावलीकर यांचे मार्गदर्शनात निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार शिवहरी थोंबे, निवडणूक लिपिक गजानन डोंगरे, राजेश लोखंडे यांच्यासह २७ ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप सिरसाट, दीपक इंगळे, मनोज मुंढे, विलास वाशिमकर, समाधान जाधव, रोहिदास भोयर, रमेश चव्हाण आदी काम पाहत आहेत.