अकोला: क्रिडाक्षेत्रात सर्वोत्कृष्ठ कामगिरी बजावणाऱ्या राज्यातील ३२ गुणवत्ताधारक खेळाडूंची शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. यामध्ये भारताची राष्ट्रीय विक्रमवीर, आशियातील सर्वोत्कृष्ठ धावपटू तसेच अर्जुन पुरस्कार प्राप्त ललिता बाबर यांची उपजिल्हाधिकारी तसेच कुस्तीपटू राहुल आवारे यांची पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.राज्याच्या कानाकोपºयातून उदयास आलेल्या विविध क्रिडा क्षेत्रातील खेळाडूंच्या उत्तुंग कामगिरीमुळे राज्याचा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक वाढला आहे. शासनासाठी ही निश्चीतच भूषणावह बाब असून अशा गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशी अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ३ आॅगस्ट रोजी बैठक पार पडली होती. सदर बैठकीत गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्यासंदर्भातील निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने बुधवारी (५ सप्टेंबर) जाहिर केला.सर्वोत्कृष्ठ ३२ खेळाडूंची नियुक्तीमैदानी स्पर्धांमध्ये वर्चस्व गाजविणाºया धावपटूंसह कुस्ती, पॉवरलिफ्टींग, धनुर्विद्या, खो-खो, रायफल शुटिंग, कबड्डी, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक, जलतरण, बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी क्रिडा प्रकारात सवोत्कृष्ठ कामगिरी करणाºया राज्यातील ३२ खेळाडूंची शासन सेवेत नियुक्ती करण्यात आली आहे. ३२ पैकी ९ दिव्यांग खेळाडूंचा समावेश आहे.या पदांसाठी लागली वर्णीखेळाडूंची गुणवत्ता लक्षात घेऊन उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, नायब तलसिलदार, तालुका क्रिडा अधिकारी, लिपीक तसेच शिपाई आदी पदांसाठी थेट नियुक्ती आदेश जारी करण्यात आले आहेत.
राज्यातील ३२ क्रिडापटूंची शासकीय सेवेत वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 2:25 PM
अकोला: क्रिडाक्षेत्रात सर्वोत्कृष्ठ कामगिरी बजावणाऱ्या राज्यातील ३२ गुणवत्ताधारक खेळाडूंची शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला.
ठळक मुद्दे सर्वोत्कृष्ठ धावपटू तसेच अर्जुन पुरस्कार प्राप्त ललिता बाबर यांची उपजिल्हाधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे. कुस्तीपटू राहुल आवारे यांची पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.