यावेळी ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
याप्रसंगी रक्तदान शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अतुल वाठ, उपसरपंच इम्रान खान, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण बाबू देशमुख, मोहन रोकडे, भाजपा सर्कल प्रमुख संतोष शिरभाते, ग्रा. वि. अधिकारी दीपक मुनेश्वर, सुरेश मालाणी, सामाजिक कार्यकर्ते सुनील भागवत आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
शिबिरात एकूण ३३ युवकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले. याप्रसंगी डॉ. बी. पी. ठाकरे, तंत्रज्ञ जावेद पठाण, रितेश राजूरकर, पंकज फुरसुले, मो. हारिश यांनी रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वितरण केले.
यावेळी ग्रा. पं. सदस्य सुनील पवार, महेंद्र गुल्हाने, विलास कांडलकर, वसंत जावरकर, जीवन इंगोले, गोपाल मालवे, गोपाल भावेकर, जगदीश गवई, निलेश मानकर यांच्यासह प्रा. आ. केंद्राचे साथरोग अधिकारी संजय घाटे, कुष्ठरोग तंत्रज्ञ मोहन सहारे, आ. से. नागराज पटले, लिपिक कैलास बागडे, मंगेश खाडे, राजू भावेकर, डॉ.रेवस्कर, सुशील खंडारे, विलास खोपे, गोवर्धन सिरसाट, अनंता विरुळकर, राहुल राठी, राहुल पांडव, बरका चव्हाण यांची उपस्थिती होती.