अकोला : विजेमुळे अनेक गोष्टी सुकर होऊन मानवी जीवन उजळून निघत असले, तरी वीज सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा फटकाही जबर असतो. सदोष विद्युत संच मांडणी व सदोष उपकरणांमुळे विद्युत अपघाताने जीवित हानी होण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत असून, विजेच्या धक्क्याने गत तीन वर्षांत जिल्ह्यात १०३ जण मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे.महावितरणकडून राज्यभरात वीज पुरवठा केला जातो. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषी अशा प्रकारच्या जोडण्या महावितरणतर्फे देण्यात येतात. घरात येणारी वीज ही फायद्याची आहे; परंतु सुरक्षा उपायांचा वापर न केल्यास ती तेवढीच धोकादायकही ठरते. शहर असो वा ग्रामीण भाग विजेची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. विजेशिवाय जगणे तसूभरही शक्य नाही. दैनंदिन जीवन असो वा उद्योग, व्यवसाय, शेती असो वीज हवी म्हणजे हवी. विजेच्या वापराचे प्रमाण पाहता विजेपासून होणाºया दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना गरजेचे आहे; परंतु दुर्दैवाने अनेक ठिकाणी सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे विजेपासून होणारे अपघात वाढले आहेत. उघड्या तारांना स्पर्श होणे, शॉर्ट सर्किटमुळे आग लागणे, घरावरील टिनपत्र्यांमधून विद्युत धक्का लागणे, कृषी पंपांमध्ये विजेचा संचार होणे आदी घटनांमध्ये मानवी जीवनाची हानी होण्याच्या घटना दरवर्षी मोठ्या प्रमाणात घडत आहेत. जिल्ह्यात गत तीन वर्षांत विद्युतसंबंधी अपघातांमध्ये १०३ जणांना प्राण गमवावा लागल्याची माहिती विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून मिळाली आहे. या तीन वर्षांमध्ये विद्युत अपघातांमध्ये ४१ जण जखमी झाले आहेत, तर ८३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. गत तीन वर्षांत शॉर्ट सर्किटमुळे ५१ ठिकाणी आग लागल्याची नोंद कार्यालयाकडे आहे.विद्युत निरीक्षक कार्यालयाकडील नोंदीनुसार, वर्ष २०१५-१६ मध्ये ३६, २०१६-१७ मध्ये ३३, तर वर्ष २०१७-१८ मध्ये ३४ जणांचा मृत्यू विद्युत अपघातांमध्ये झाला. या कालावधीत लागलेल्या आगींमध्ये लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.आजपासून विद्युत सुरक्षा सप्ताहसर्वसामान्य लोकांमध्ये विद्युत नियमांचे पालन करण्याची जाणीव निर्माण होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने ११ जानेवारी २०१८ ते १७ जानेवारी २०१८ पर्यंत विद्युत सुरक्षा सप्ताह राबविण्याचे ठरविले आहे. या सप्ताहात विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग, अकोला यांच्यामार्फत शाळा, महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शनपर कार्यक्रम, निबंध व चित्रकला स्पर्धा, जनजागृती रॅली, ग्रामीण स्तरावर सभा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्युत निरीक्षक आर. डब्ल्यू. महालक्ष्मे, सहा. विद्युत निरीक्षक वैष्णव, शाखा अभियंता थोटे, घुगे, धात्रक, तिवारी, कनिष्ठ अभियंता चौधरी हे विद्युत सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वीज वितरण कंपनी व जिल्ह्यातील विद्युत कंत्राटदार यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.
अकोला जिल्ह्यात विद्युत अपघातात दरवर्षी जातो ३४ जणांचा बळी; गत तीन वर्षांत १०३ जणांचा मृत्यू
By atul.jaiswal | Published: January 11, 2018 1:25 PM
अकोला : विजेमुळे अनेक गोष्टी सुकर होऊन मानवी जीवन उजळून निघत असले, तरी वीज सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा फटकाही जबर असतो. सदोष विद्युत संच मांडणी व सदोष उपकरणांमुळे विद्युत अपघाताने जीवित हानी होण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत असून, विजेच्या धक्क्याने गत तीन वर्षांत जिल्ह्यात १०३ जण मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे.
ठळक मुद्देसदोष विद्युत संच मांडणी व सदोष उपकरणांमुळे विद्युत अपघाताने जीवित हानी होण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे.गत तीन वर्षांत विद्युतसंबंधी अपघातांमध्ये १०३ जणांना प्राण गमवावा लागल्याची माहिती विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून मिळाली आहे. विद्युत अपघातांमध्ये ४१ जण जखमी झाले आहेत, तर ८३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. गत तीन वर्षांत शॉर्ट सर्किटमुळे ५१ ठिकाणी आग लागल्याची नोंद कार्यालयाकडे आहे.