शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

वाशिम जिल्ह्यातील ३४६गावांची कोरोनावर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 11:53 AM

346 villages in Washim district beat Corona: गावकऱ्यांची सतर्कता आणि प्रशासनाचे परिश्रम या बळावर जिल्ह्यातील तब्बल ३४६ गावांनी दुस-या लाटेत कोरोनावर मात केली आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक विचारांची पेरणी, गावकऱ्यांची सतर्कता आणि प्रशासनाचे परिश्रम या बळावर जिल्ह्यातील तब्बल ३४६ गावांनी दुस-या लाटेत कोरोनावर मात केली आहे. तिसरी लाट रोखण्यासाठीदेखील आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर राहणार आहे.जिल्ह्यात गतवर्षी ३ एप्रिल रोजी मेडशी (ता. मालेगाव) या ग्रामीण भागातच कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत एकूण कोरोनाबाधित रुग्ण ७,१४३ होते. यापैकी ६,८३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर १५४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुस-या लाटेत फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीत जिल्ह्यात ३२ हजारावर रुग्ण आढळून असून यापैकी ३०,४९० जणांनी कोरोनावर मात केली तर ४२४ जणांचा उपचारादरम्या मृत्यू झाला. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दुसरी लाट ओसरत असून, जून महिन्यात तर रुग्णसंख्याही दोन अंकी येत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. दुस-या लाटेत जिल्ह्यातील ६८७ गावांत कोरोना रुग्ण आढळून आले. ग्रामपंचायत प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांची सतर्कता, सकारात्मक विचार, आरोग्य, पोलीस, महसूल, जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनातील प्रत्येक घटकांचे परिश्रम या बळावर ७ जूनपर्यंत ३४६ गावांतील रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ३४१ गावांत सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, तिस-या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने गावात १०० टक्के लसीकरण करणे, गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे, कोरोनाविषयक नियमांबाबत  जनजागृती करण्यावर ग्रामपंचायतींनी भर दिल्याचे दिसून येते.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे, ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. ग्रामीण भागात सक्रिय रुग्णसंख्या कमी होत आहे. कोरोनाचा धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे यापुढेही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येकाने खबरदारी घ्यावी.- शण्मुगराजन एस.जिल्हाधिकारी, वाशिम