लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुने शहरातील शिवसेना वसाहतमध्ये असलेल्या न्यु गुरुदेवनगरमध्ये पाच घरांमध्ये वनस्पती व बेरीपासून बनविण्यात येत असलेल्या बनावट तुपाच्या साठय़ावर शहर पोलीस उप अधीक्षकांचे पथक, जुने शहर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने सोमवारी पहाटे छापेमारी केली. यावेळी ३५0 किलो बनावट तूप जप्त करण्यात आले आहे. आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक जण फरार आहे.न्यू गुरुदेवनगरमध्ये श्याम सोळंके, भगवान गिरी, सुनील वैस, कन्हैया बामने, राजू गिरी, गजानन गिरी, अशोक गिरी, नारायण गिरी, गुलाब गिरी यांच्या घरामध्ये वनस्पती, तूप, घट्ट तेल व तु पाची बेरी याचे मिश्रण तयार करून, बनावट तूप तयार करण्यात येत असल्याची माहिती शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाला मिळाली. त्यांच्या पथकाने न्यू गुरुदेवनगरातील या नऊ जणांच्या पाच घरांमध्ये छापेमारी केली. या छाप्यात पाच घरांमधून १६0 किलो वनस्पती तूप, १६0 किलो संशयित तूप, ३३ किलो तुपाची बेरी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील व साहाय्यक आयुक्त नितीन नवलकार यांच्या मार्गदर्शनात पीएसआय बाळकृष्ण पवार, श्रीकृष्ण इंगळे, रवी शिरसाट, विठ्ठल विखे, दीप किल्लेदार, मिथिलेश सुगंधी, जुने शहर ठाण्या तील दत्ता पवार, संजय जाधव, विनोद चोरपगार, अनिस, ठाकूर, महेंद्र बहादूरकर यांनी केली.
असे तयार होते बनावट तूपवनस्पती तूप, संशयित तूप व तुपाची बेरी याचे मिश्रण करणे व त्यानंतर हे मिश्रण काही वेळ उकळत ठेवत होते. या तीन पदा र्थांचे मिश्रण काही काळ उकळल्यानंतर तुपाच्या बेरीचा सुगंध या बनावट तुपाला येत होता. या सुगंधावरून सदरचे बनावट तूप हे शुद्ध तुपापेक्षाही अधिक चांगले असल्याचा भास ग्राहकांना होत होता.
तुपाचे सहा नमुने घेतले!अन्न व औषध प्रशासन विभागाचे साहायक आयुक्त नितीन नवलकार यांनी या बनावट तुपाचे सहा नमुने घेतले आहेत. यामध्ये दोन नमुने वनस्पतीचे, दोन नमुने तुप बेरीचे आणि दोन नमुने संशयित तुपाचे घेण्यात आले आहेत. हे नमुने त पासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
आरोग्यासाठी घातकसदर बनावट तूप आरोग्यासाठी प्रचंड घातक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सोबतच अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न निरीक्षक यदुराज दहातोंडे व नमुना साहाय्यक पांडे यांनी तुपाची पाहणी केल्यानंतर हे तूप शरीरास घातक असल्याचे सांगितले. सदर तुपाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, ते शरीरास अपायकारक असल्याचाच अहवाल येणार असल्याचा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला.
आरोपी परभणी, हिंगोली जिल्हय़ातीलबनावट तूप तयार करणारे हे आरोपी हिंगोली व परभणी जिल्हय़ातील असून, ते अकोल्यात स्थायिक झाले आहेत. त्यांनी बनावट तूप विक्रीचा व्यवसायच या ठिकाणी थाटला होता. बनावट तूप तयार करून ते खेड्या-पाड्यांमध्ये स्वस्त दराने विक्री करीत असल्याची माहिती समोर आली आहे. ७00 रुपये किलोचे तूप केवळ ३00 ते ४00 रुपये किलोने विक्री करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
शहरात व जिल्हय़ात कुठेही खुले तूप विक्री होत असल्यास ते ग्राहकांनी खरेदी करू नये, नोंदणी असलेल्या दूध डेअरीमधून तूप खरेदी केल्यास फसवणूक होणार नाही. तेल, तूप व खाद्य पदार्थांची अशाप्रकारे विक्री होत असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला तत्काळ माहिती द्यावी.- नितीन नवलकारसाहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, अकोला.