अकोला: जिल्ह्यातील धरणामध्ये ३० टक्क्यावर जलसाठा संकलित झाल्याने यावर्षी खरिपातील पिकांना सिंचनासाठी पाणी देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा या मोठ्या धरणात आतमितीस ३६.४२ टक्के जलसाठा आहे. नियमानुसार धरणात ३३ टक्के जलसाठा उपलब्ध असला तर सिंचनासाठी पाणी देता येते. त्यामुळे यावर्षी या धरणाच्या क्षेत्रातील सिंचनासाठी पाणी मिळते का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. रब्बी हंगामाला पाणी देण्यापूर्वी पिण्यासाठीच्या पाण्याचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर उर्वरित पाणी सिंचनासाठी सोडण्याचा विचार केला जातो. गत वर्षापेक्षा यावर्षी धरणात बºयापैकी जलसाठा असल्याने रब्बीतही सिंचनासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पावसाळ््याचे आणखी दोन महिने पुढे असल्याने धरण साठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पातूर तालुक्यातील निर्गुणा मध्यम धरणात ३८.८९ टक्के जलसाठा संचयित झाला असून, याच तालुक्यातील मोर्णा धरणात २१.८३ टक्के जलसाठा आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात ३०.५७ टक्के जलसाठा असून, अकोला, बुलडणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वान धरणात आजमितीस ५५.५६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.- जिल्ह्यातील धरणात आजमितीस सरासरी ३० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पावसाचे दोन महिने पुढे असल्याने चांगला पाऊस येऊन धरण पूर्ण क्षमतेने भरतील अशी अपेक्षा आहे. सिंचनासाठी पाणी हा शेतकºयांचा हक्क आहे; पण धरणातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार यासंदर्भातील निर्णय होत असतात. त्यासाठी आणखी वेळ आहे.अंकुर देसाई,अधीक्षक अभियंता,पाटबंधारे मंडळ, अकोला.