अकोला : राज्याच्या विकासाच्या मापदंडाला महावितरणच्या सेवेतून ऊर्जा देण्याचे काम करणाऱ्या महावितरण अकोला परिमंडळातील ७ यंत्रचालक आणि ३१ तांत्रिक कर्मचारी यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
येथील विद्युत भवनात १ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर जागतिक कामगार दिनानिमित्त महावितरणमध्ये कार्यरत ३८ कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट,सहाय्यक महाव्यवस्थापक मनिषकुमार भोपळे,उपविधी अधिकारी सुनिल उपाध्ये,कार्यकारी अभियंते ग्यानेश पानपाटील,विजयकुमार कासट,जयंत पैकीने,शशांक पोंक्षे,उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर उपस्थित होते. सन्मानित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील १३, बुलडाणा जिल्ह्यातील १८ आणि वाशिम जिल्ह्यातील ७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर यांनी केले तर संचालन आणि आभार प्रदर्शन यंत्रचालक अशोक पेठकर यांनी केले.
कर्मचाऱ्यांसाठी टेबल टेनिस कोर्टचे उद्धाटनकर्मचाऱ्यांमधील खेळाडू वृतीचे जतन करण्यासाठी आणि त्यांच्या फिटनेससाठी विद्युत भवन येथे तयार करण्यात आलेल्या टेबल टेनिस कोर्टचे उद्धाटन मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले. महावितरणची अखंडित सेवा देण्यासोबत कुटूंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मानसिक आणि आरोग्याचे दृष्टीने संपूर्ण फिट राहणे अत्यंत गरजेचे आहे.त्यासाठी कर्माचाऱ्यांनी किमान एक तास स्वत:ला वेळे द्यावा.या काळात कर्मचाऱ्यांनी ज्यांना जमेल तसे,चालणे,व्यायाम,योगा,खेळणे इत्यादी आवर्जून करावे असे आवाहन यावेळी मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले.