शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

३८१ पॉस मशीनची गरज, मिळाल्या फक्त १00!

By admin | Published: July 07, 2017 1:47 AM

रासायनिक खत विक्रीसाठी तेल्हाऱ्यात वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रासायनिक खतांची आॅनलाइन विक्री १ जूनपासूनच करण्याचे ठरले असताना, जिल्ह्यात अद्यापही आवश्यकतेएवढ्या पॉस मशीनचा पुरवठा झालेला नाही. जिल्ह्यातील कृषी केंद्रांमध्ये आवश्यक असलेल्या ४३१ पैकी पहिल्या टप्प्यात ५०, त्यानंतर आता १०० मशीनचा पुरवठा बुधवारी करण्यात आला. आता मिळालेल्या सर्व मशीनचे वाटप तेल्हारा तालुक्यात देत हा संपूर्ण तालुका आॅनलाइन करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केला आहे. खत खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डची आॅनलाइन पडताळणी होणार आहे, तसेच त्याच व्यक्तीने खत घेतल्याची नोंद म्हणून त्याचा अंगठाही घेतला जाणार आहे. खतांची विक्री आॅनलाइन करण्यासाठी जिल्ह्यातील कृषी केंद्रांमध्ये ४३१ पॉस (पॉइंट आॅफ सेल) मशीन आवश्यक आहेत. तरी संबंधित कंपनीने सुरुवातीला केवळ ५० मशीन उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर पॉस मशीनचा पुरवठा तातडीने करावा, यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे यांनी १७ मे आणि त्यानंतरही सातत्याने पुरवठादार कंपनीला पत्र पाठविले. त्यानंतरही आतापर्यंत पॉस मशीनचा पुरवठा झाला नव्हता. तब्बल दीड महिन्यानंतर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला १०० मशीन बुधवारी मिळाल्या. केंद्र शासनाने आधीच यादीनुसार अकोला जिल्ह्यात ४३१ कृषी सेवा केंद्रांमध्ये पॉस मशीन दिल्या जात आहेत. आधीच्या आणि आताच्या मिळून १५० मशीनचे वाटप कृषी विभागाकडून झाले आहे. मशीन पुरविणे, विक्रेत्यांना प्रशिक्षण देणे, आॅनलाइनसाठी समन्वय ठेवण्याची जबाबदारी पुरवठादार झुआरी डिलर्सची आहे. मात्र, आवश्यकतेएवढ्या पॉस मशीन उपलब्धच झालेल्या नाहीत. त्यामुळे या उपक्रमाची अंमलबजावणी सुरुवातीलाच रखडली आहे.