लोकमत न्यूज नेटवर्कआलेगाव/ खेट्री (अकोला): शिरपूर येथील बंद घरातून १० किलो गोमांस, बैल व वासरांचे ३९ चामडे चान्नी पोलिसांनी २० आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जप्त केले. शिरपूर येथील एका घरात बैल व वासरांचे चामडे असल्याची माहिती चान्नीचे ठाणेदार वैभव पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी त्यांच्या सहकाºयांसह सदर घरावर धाड टाकली. यावेळी गुरांचे ३९ चामडे, साहित्य व एक दुचाकी असा ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी शेख उस्मान शेख बुरहान याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या ४२९ , ५, ५ (अ), ६,७, ९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक आदिनाथ घाटेकर करीत आहे. वृत्त लिहीपर्यंत आरोपीला अटक करण्यात आली नव्हती.
शिरपूर येथे गोमांसासह गुरांचे ३९ चामडे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 8:31 PM
आलेगाव/ खेट्री (अकोला): शिरपूर येथील बंद घरातून १० किलो गोमांस, बैल व वासरांचे ३९ चामडे चान्नी पोलिसांनी २० आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जप्त केले.
ठळक मुद्देबंद घरातून १० किलो गोमांस, बैल व वासरांचे ३९ चामडेचान्नी पोलिसांची कारवाई