अकोला: जिल्ह्यातील २७१ गावांमध्ये ३९१ नादुरुस्त हातपंप दुरुस्तीची कामे मार्च अखेरपर्यत महिनाभराच्या कालावधीत पूर्ण करण्यात आली असून, सद्यस्थितीत जिल्ह्यातील ४२ गावांमध्ये नादुरुस्त ६८ हातपंप दुरुस्तीची कामे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा यांत्रिकी विभागामार्फत सुरु आहेत.
तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध गावांत पाणीटंचाइचे चटके जाणवू लागले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी काही गावांत नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. त्यामध्येच हातपंप नादुरुस्त झाल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाइच्या समस्येचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्याची कामे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा यांत्रिकी विभागामार्फत सुरु करण्यात आली आहेत. त्यामध्ये मार्च अखेरपर्यंंत महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यातील २७१ गावांमध्ये ३९१ नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्याची कामे पूर्ण करण्यात आली असून, सद्यस्थितीत जिल्ह्यातील ४२ गावांमध्ये ६८ नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्याची कामे सुरु आहेत.
जिल्ह्यातील २७१ गावांत नादुरुस्त झालेल्या ३९१ हातपंप दुरुस्तीची कामे मार्च महिन्यात पूर्ण करण्यात आली आहेत. सध्या जिल्ह्यातील ४२ गावांमध्ये ६८ नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्याची कामे सुरु आहेत.
एस.बी.मेंढे
उपअभियंता, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा यांत्रिकी विभाग.