सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये कोट्यवधींच्या घोटाळ््यानंतर जलयुक्त शिवार अभियानातून कृषी विभागाने तयार केलेले सिमेंट नाला बांधांनाही त्या बंधाऱ्यांच्या बुडीत क्षेत्रात मंजुरी देऊन ३९ लाखांचा निधी पाण्यात जिरवण्याचा प्रकार चौकशीत उघड झाला आहे. त्यामध्ये पातूर तालुक्यातील कृषी सहायकांपासून ते अकोटचे उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर यांच्यावर जबाबदारी निश्चित होणार आहे.पातूर तालुक्यातील भानोस येथे सिमेंट काँक्रिट नाला बांधांची कामे करण्यात आली आहेत. पातूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने ही कामे केली आहेत. त्या गावात जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने आधीच भानोस-२ या कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती केली आहे. ज्या नाल्यावर आणि जागेवर हा बंधारा आहे, त्याच बंधाऱ्याच्या वरील बाजूस पाच साखळी सिमेंट काँक्रिट नाला बांधाची कामे करण्यात आली. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ ने २० एप्रिल २०१७ रोजी प्रसिद्ध केले. जवळपास सर्वच बांध कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रात आहेत. एक सिमेंट नाला बांध बंधाऱ्याच्या वरच्या बाजूस केवळ १५० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या साठ्याच्या बुडीत क्षेत्रात बांध बुडण्याचे तारतम्यही कृषी विभागाने ठेवले नाही, हे विशेष. अंदाजपत्रकात त्या बंधाऱ्याच्या साठ्याची लांबी ९०० मीटर दाखवण्यात आली आहे. त्यातून केवळ निधी अडवा, निधी जिरवा, असाच कार्यक्रम राबवल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबतची तक्रार संजय सुरवाडे यांनी केली. त्यावर चौकशी अधिकारी म्हणून त्या सर्व बांधांची प्रथम स्थळ निश्चिती आणि तांत्रिक मंजुरी देणारे अकोटचे उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर यांना नेमण्यात आले. ‘लोकमत’च्या दणक्यामुळे चौकशी समितीलोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर २१ एप्रिल रोजी कंडारकर यांच्याकडे देण्यात आलेली चौकशी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी रद्द केली. चौकशी समिती नेमली. त्यामध्ये अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालक एस.डी. मालपुरे, तंत्र अधिकारी सुनील सोनकुसरे, कृषी पर्यवेक्षक जी.एल. महल्ले यांचा समावेश होता. समितीने अहवाल सादर केला आहे.नाल्यातील उघड्या खडकावर बांधकामसाखळी सिमेंट काँक्रिट नाला बांधांच्या कामांना पाणी साठ्यावर आधारित मापदंड नाहीत. त्यामुळे सिमेंट नाला बांध खोलीकरणासह करावे लागतात. ज्या ठिकाणी खोलीकरण करता येत नाही, त्या ठिकाणी ही कामे करता येत नाहीत. भानोस येथे सिमेंट नाला बांधाची कामे केलेल्या ठिकाणी नाल्यात वरच खडक उघडा पडलेला आहे, तसेच कमी खोलीवर खडक आहे. त्यामुळे बांधलेले सिमेंट नाला बांध खोलीकरणाशिवायच केले. त्याशिवाय एम-१५ ग्रेडच्या काँक्रिटमध्ये काम न करता ते एम-१० मध्ये करण्यास उपविभागीय कृषी अधिकारी कंडारकर यांनी तांत्रिक मंजुरी दिली.बंधारा बुडीत क्षेत्र २५० मीटर, बांध १९० मीटरवरसिमेंट नाला बांध आय-६ याच्या खालील बाजूस १९० मीटर अंतरावर कोल्हापुरी बंधारा आहे. त्या बंधाऱ्याचे बुडीत क्षेत्र २५० मीटर आहे. त्यामुळे नाला बांधाचे काम ६० मीटरपर्यंतच्या बुडीत क्षेत्रात केल्याचे स्पष्ट झाले.मेरीचे संकल्पचित्र; मापदंड गुंडाळले!सिमेंट नाला बांधांची कामे दगडी धरण मंडळ, मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना (मेरी) अधीक्षक अभियंता यांनी ठरवून दिलेल्या कोणत्याही मार्गदर्शक सूचनेप्रमाणे झालेले नाही. संकल्प चित्राप्रमाणे निश्चित केलेल्या एम-१५ या संधानकाऐवजी एम-१० मध्ये ते करण्यात आले. बांधाच्या अंदाजपत्रकावर सर्वांच्या स्वाक्षरीभानोस पाणलोट क्षेत्रातील आय-१ ते आय-९ या बांधाच्या कामांच्या सविस्तर अंदाजपत्रकावर कृषी सहायक अमोल इडोळे, पर्यवेक्षक फुलारी, मंडळ कृषी अधिकारी सागर डोंगरे, तालुका कृषी अधिकारी एस.एम. मकासरे, उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर या सर्वांच्या स्वाक्षरी आहेत.
सिमेंट नाला बांधांचे ४० लाख रुपये पाण्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:49 AM