अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महावितरणच्यावतीने सौभाग्य योजनेतून राज्यातील दलितबहुल गावात १०० टक्के विद्युतीकरणाच्या कार्यक्रमांतर्गत राज्यभरातील १९२ गावांत १४ एप्रिल ते ३०एप्रिल या दरम्यान ‘ग्रामस्वराज्य’अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ३४ गावांचा समावेश असून, वीज जोडणी देण्याची प्रकिया सुरु झाली आहे.राज्यातील ज्या गावात ८० टक्यापेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे अशा गावात १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. यात अकोला जिल्ह्यातील ३४ गावांमध्ये जवळपास ४०० नवीन विद्युत जोडण्या देण्यात येणार आहेत. त्यासाठी स्थानिक स्तरावर शिबीर लावण्यात येणार असून, या शिबिरात लाभार्थ्यांना तत्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे. ज्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आलेला आहे अशा ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरली तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सदर गावांमध्येही या अभियाना अंतर्गत सौभाग्य योजनेतील तरतुदींप्रमाणे १०० टक्के वीज जोडणी दिल्या जाणार आहे. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री हर घर बिजली योजना, अर्थात सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून, ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी या सर्व ३४ गावात मोठया संख्येत शिबीरे लावण्यात येणार आहे. या शिबिरात लाभार्थ्यांना तात्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे. या अभियानात जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सहभागी होऊन, सौभाग्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.या गावांचा आहे समावेशअकोला उपविभाग - वल्लभनगर, पळसो (बु.) , कासमपूर, कोठारी, सोनाळा, खरप (बु.), हिगंणा म्हैसपूर, रिधोराअकोट उपविभाग - रोहनखेड, हिंगणी(बु.), दहीहांडा.बाळापुर उपविभाग - निंबा, कवठा, उरळ, मोरझाडी, चिंचोली, नकाशी, भरतपूर.बार्शीटाकळी उपविभाग - दोनद(बु.), विरहित.मुर्तिजापूर उपविभाग - दुधलम, लाखपुरी, मंगरूळ(कांबे), गोरेगाव, चिखली, अनभोरा, बोरटा, पोहीपातुर उपविभाग - तुलंगा(बु.), सुकळी, भंडारज, आस्टूलतेल्हारा उपविभाग - वरखेड, उबरखेड, खैरखेड