लसीकरणापूर्वी समुपदेशन
कोविड लसीकरणासंदर्भात गर्भवतींमध्ये भीतीचे वातावरण आहे. गर्भवतींची ही भीती लक्षात घेता लसीकरणापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी त्यांच्या मनातील शंकांचे निवारण देखील करण्यात आले. तसेच लस घेतल्यानंतर हलका ताप किंवा हात, पाय दुखल्यास काय करावे या विषयी देखील डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. कोरोनापासून बचावासाठी लसीकरणाचे महत्त्व देखील येथील डॉक्टरांनी उपस्थित गर्भवतींना पटवून दिले.
हेल्थ केअर वर्कर - १९,१६६
फ्रंटलाइन वर्कर - १९९५६
१८ ते ४४ वर्षे वयोगट - १,२३,७०९
४५ वर्षांवरील - ३,३२,८४७
गर्भवती - ४१
न घाबरता लस घ्या
जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनंतर केंद्र आणि राज्य शासनानेही गर्भवतींच्या लसीकरणास परवानगी देण्यात आली आहे. गर्भवतींसाठीचे लसीकरण हे सुरक्षित असून गर्भवतींनी न घाबरता लस घ्यावी.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ