शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
5
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
6
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
7
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
8
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
9
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
10
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
11
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
12
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
13
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
14
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
15
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
18
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
19
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
20
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल

जिल्हा बँकेचे ४१ हजार शेतकरी थकबाकीदार!

By admin | Published: June 27, 2017 10:17 AM

दीड लाखाची कर्जमाफी; परिपत्रक न निघाल्याने बँका संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शासनाने दीड लाख रुपयांची कर्जमाफी केली आहे. तथापि, या संदर्भातील परिपत्रक बँकांपर्यंत पोहोचले नसल्याने बँका संभ्रमात आहेत. तीन दिवसांच्या शासकीय सुट्यांनतर मंगळवारी बँका उघडणार आहेत. शेतकऱ्यांना काय उत्तर द्यावे, हा प्रश्न बँकांपुढे आहे. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ४१ हजार थकबाकीदार असून, जिल्हा बँकेने जास्त वेळ काम करू न शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्यात येणार आहे.शेतकरी आंदोलनानंतर शासनाने जून महिन्याच्या सुरुवातीला कर्जमाफी जाहीर केली आहे. सुकाणू समिती व विरोधी पक्षातील नेत्यांच्या चर्चेनंतर सरकारने कर्जमाफीची मर्यादा एक लाखावरू न दीड लाख रुपयांपर्यंत केली आहे. कर्जफेड परत करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार अनुदान देण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्हा बँकेचे २ लाख १८ हजार शेतकरी सभासद आहेत. ३० जून २०१६ पर्यंत यातील ४१ हजार शेतकरी थकबाकीदार आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचे २०१३-१४ पुनर्गठन झाले असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांची कर्ज परतफेड सुरू आहे. यातील ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम हप्त्यांनी परत केली आहे, त्यांना यावर्षी पीक कर्ज देण्यात येत आहे; परंतु शासनाने कर्जमाफीची मर्यादा दीड लाखापर्यंत केल्याने ४१ हजार शेतकऱ्यांमधील किती शेतकरी दीड लाखाच्या आत व वर आहेत हे बघण्याचे काम बँक करीत आहे. कर्जमाफी ही ३० जून २०१६ पर्यंत आहे; परंतु ज्या शेतकऱ्यांनी ३० जून रोजी किंवा त्यानंतर कर्ज परतफेड केली असेल त्या शेतकऱ्यांना दीड लाख कर्जमाफीचा दिलासा मिळणार की नाही, याची स्पष्टता नाही. त्यासाठी शासनाचे यासंदर्भातील परिपत्रक निघाल्यानंतरच समजणार असल्याने बँकांचे अधिकारी या विषयावर बोलण्याचे टाळत आहेत. अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जे ४१ हजारावर थकबाकी शेतकरी आहेत, यातील काही दीड लाखाच्या आत तर काही वर आहेत. या सर्वांची नव्याने आकडेवारी काढली जाणार आहे.तीन दिवसानंतर बँक उघडणार असल्याने त्या दृष्टीने आम्ही तयारी केली आहे. जास्त वेळ काम करू न शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्हा बँकेचे ४१ हजारावर थकबाकीदार आहेत; परंतु अद्याप परिपत्रक न आल्याने यावर बोलणे संयुक्तित ठरणार नाही.- अनंत वैद्य,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अकोला.