अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिलपासून सुरू केलेल्या ‘सौभाग्य’ योजनेतून महावितरणच्यावतीने राज्यातील दलितबहुल गावात १०० टक्के विद्युतीकरणाच्या कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्ह्यातील ३४ गावांत हे अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून ३४ गावांमध्ये ४१० घरांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे.राज्यातील ज्या गावात ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलितवस्ती व गरीब कुटुंबांची संख्या अधिक असलेल्या गावांमध्ये १०० टक्के विद्युतीकरण करण्याची ही योजना होती. यात अकोला जिल्ह्यातील ३४ गावांमध्ये जवळपास ४१० नवीन विद्युत जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यासाठी ३४ गावांमध्ये स्थानिक स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांच्या माध्यमातून लाभार्थींना तत्काळ वीज जोडणी देण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री हर घर बिजली योजना, अर्थात सौभाग्य योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून, ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात येत आहे. १४ एप्रिल ते ३० एप्रिल या दरम्यान संपूर्ण राज्यात ‘ग्रामस्वराज्य’ अभियान राबविण्यात येत आहे.या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा सर्व ३४ गावांमध्ये शिबिर लावण्यात आली होती. या शिबिरात गावकऱ्यांना योजनेची माहिती देण्यात येऊन तत्काळ वीज जोडणी देण्यात आली आहे. या अभियानात जास्तीत जास्त लाभार्थींनी सहभागी होऊन, सौभाग्य योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर आणि अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे कार्यकारी अभियंते, अभियंते व जनमित्र यांनी परिश्रम घेतले.या गावांमध्ये दिल्या नवीन वीज जोडण्यावल्लभनगर-१३, पळसो (बु.)-९, कासमपूर-५, कोठारी-२, सोनाळा-१७, खरप (बु.)-६, हिगंणा-म्हैसपूर-३२, रिधोरा-२५, रोहनखेड-८, हिंगणी (बु.)-२०, निंबा-८, कवठा-११, उरळ बु.-३, मोरझाडी- १४, चिंचोली गणू-६, नकाशी-१०, भरतपूर-५, दोनद (बु.)-१०, विराहित-७, दुधलम-४, लाखपुरी-१०, मंगरूळ (कांबे)-६, गोरेगाव-१०, चिखली-१०, अनभोरा-६, बोरटा-८, पोही-१३, तुलंगा(बु.)-२७, सुकळी-१७, भंडारज-४५,आस्टूल-२१, वरखेड-१०, उबरखेड-७, खैरखेड-५ या गावांमध्ये वीज जोडण्या देण्यात आल्या.