अकोला : कोरोना काळात पश्चीम वऱ्हाडात डेंग्यूच्या ४३ रूग्णांची नोंद झाली असून अकोल्यात २१ , बुलडाण्यात १७ व वाशिम मध्ये ५ रूग्णांची नोंद झाली आहे. पश्चीम वऱ्हाडच्या तिन्ही जिल्ह'ात डेंग्यूचा एकही मृत्यू नसला, तरी नागरिकांनी वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोनाचा कहर सुरू असताना इतर आजार डोके वर काढू लागले आहेत. यामध्ये प्रामुख्याने व्हायरल फिव्हरसोबतच डेंग्यूचाही धोका वाढला आहे. मागील सहा महिन्यांमध्ये जिल्'ात डेंग्यूचे ४३ रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण शहरासह ग्रामीण भागात आढळून आले आहेत. गत वर्षीच्या तुलनेत हा आकडा काही प्रमाणात कमी असला, तरी कोरोना काळात हा आजार धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी बेफिकिरी न करता वेळीच सावध होऊन प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान यंदाही एकाही व्यक्तीचा या आजाराने मृत्यू झाला नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
पश्चीम वऱ्हाडात आढळले डेंग्यूचे ४३ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 11:52 AM