शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

२0 टक्के अनुदान घोषित शाळांमधील ४३ हजार शिक्षक वेतनापासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 11:16 AM

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षकांवर दुहेरी संकट ओढवले आहे.

अकोला : राज्य शासनाने शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील २0 टक्के अनुदान घोषित केले होते. त्यानुसार निधीही उपलब्ध करून दिला; परंतु अद्यापही घोषित शाळांमधील शिक्षकांना वेतन देण्यात आले नाही. शिक्षक वेतनापासून वंचित आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षकांवर दुहेरी संकट ओढवले आहे. एवढेच नाही तर अघोषित शाळांमधील १६ हजारावर शिक्षकांनाही वेतन नसल्यामुळे त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे.संचारबंदीमुळे नियमित वेतन मिळण्याऱ्या कर्मचाऱ्यांशिवाय ज्यांना वेतन मिळत नाही असे विनावेतन काम करणारे राज्यातील हजारो शिक्षक अडचणीत आले आहेत. २00९ मध्ये माध्यमिक विभागाचा कायम शब्द काढण्यात आला व त्यांना २0१६ पासून २0 टक्के अनुदानाची तरतूद करण्यात आली. माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द शिक्षक महासंघ व विज्युक्टाच्या परीक्षा बहिष्कार आंदोलनादरम्यान २६ फेब्रुवारी २0१0 ला काढण्यात आला; मात्र वेतन अधिक अनुदानाची शासनाने तरतूद केली नाही. यासंदर्भात शिक्षक संघटनांनी अनेकदा आंदोलने केली. गत १0 ते १५ वर्षांपासून विनावेतन काम करणारे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील ४३ हजार ११२ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी एकूण ४ हजार ६२३ शाळांवर काम करीत आहेत. अखेर शासनाने ही मागणी मंजूर करीत घोषित शाळांना २0 टक्के अनुदान देण्याचे निश्चित केले. उच्च माध्यमिकसाठी १0७ कोटी आणि प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी रुपयांच्या निधीची तरतूदही केली; मात्र शासनाने शिक्षकांना वेतन देण्याचे आदेशच काढले नाहीत. त्यामुळे विनावेतन काम करणारे घोषित शाळांमधील ४३ हजार आणि अघोषित शाळांमधील १६ हजार शिक्षक वेतनापासून वंचित राहिले आहेत. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी आहे. अशा परिस्थितीत वेतन नाही. दुसरा कोणता उद्योग नाही. त्यामुळे विनावेतन काम करणाºया शिक्षकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे कठीण झाले आहे. अशा संकटामुळे राज्य शासनाने शिक्षकांना मंजूर वेतन व अनुदान तातडीने देण्याची मागणी होत आहे.

पात्र विनाअनुदानितला १ एपिल २0१९ पासून पहिला टप्पा वेतन अनुदान लागू करण्याचा लेखी करार तत्कालीन शासनाने संघटनेच्या बैठकीत घेतला होता. पुन्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नव्या शासनाने २0 टक्के अनुदान जाहीर केले; परंतु वेतन देण्याचे निर्देश दिले नाहीत. शासनाने शिक्षकांना वेतन द्यावे. याबाबत शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा झाली असता, त्यांनी संचारबंदीनंतर निर्देश देण्याचे सांगितले.-प्रा. डॉ.अविनाश बोर्डे, प्रांताध्यक्ष, विज्युक्टा

 

टॅग्स :Teacherशिक्षकAkolaअकोला