शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

४४ गावांतून टँकर हटवण्याची तयारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 1:42 AM

अकोला : खारपाणपट्टय़ातील ५५ गावांमध्ये टँकरने सुरू असलेला पुरवठा बंद करून त्याऐवजी ८४ खेडी योजनेतून त्यापैकी ४४ गावांना पुरवठा करण्याच्या उपाययोजनेचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने तयार केला आहे. प्रशासकीय मान्यतेनंतर जलव्यवस्थापन समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे.

ठळक मुद्दे८४ खेडी योजनेतून पाणी पुरवठय़ाची उपाययोजना

सदानंद सिरसाट। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खारपाणपट्टय़ातील ५५ गावांमध्ये टँकरने सुरू असलेला पुरवठा बंद करून त्याऐवजी ८४ खेडी योजनेतून त्यापैकी ४४ गावांना पुरवठा करण्याच्या उपाययोजनेचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने तयार केला आहे. प्रशासकीय मान्यतेनंतर जलव्यवस्थापन समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे.खारपाणपट्टय़ातील गावांसाठी जीवनवाहिनी असलेली ६४ खेडी पाणी पुरवठा योजना पावसाळ्य़ातच म्हणजे ऑगस्टमध्ये बंद पडली. त्यामुळे मोठय़ा संख्येने असलेल्या या गावांना पाणी पुरवठा कोठून करावा, ही समस्या उभी ठाकली. त्यावर उपाययोजना म्हणून २६ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. गेल्या वर्षी योजनेतील ५५ गावांना वान प्रकल्पाच्या देवरी फाटा आणि चोहोट्टा येथील व्हॉल्व्हवरून टँकरमध्ये पाणी घेण्यात आले. यावर्षी वानचे पाणी मिळते की नाही, ही समस्या पावसाळ्य़ातही होती. सद्यस्थितीत प्रकल्पातील साठा पाहता या गावांना पाणी मिळू शकते, हे निश्‍चित झाल्यानंतरच टँकर बंद करण्याची तयारी सुरू झाली. त्यातच प्रकल्पावर अकोट शहर अधिक ८४ खेडी योजना, तेल्हारा शहर, शेगाव शहर अधिक संस्थान, जळगाव जामोद शहर, संग्रामपूर अधिक १४४ खेडी योजनेतील गावे अवलंबून आहेत. 

योजनेतील ही आहेत टँकरग्रस्त गावे टँकरने पुरवठा सुरू असलेल्या ५५ गावांमध्ये अकोला तालुक्यातील सांगवी खुर्द, गोपालखेड, वल्लभनगर, गांधीग्राम, सांगवी बुद्रूक, हिंगणा तामसवाडी, फरार्मदाबाद, निंभोरा, नवथळ, खेकडी, परितवाडा, पाळोदी, निराट, वैराट, गोत्रा, धामणा, राजापूर, बादलापूर, कंचनपूर, आगर, कासली बुद्रूक, कासली खुर्द, म्हातोडी, घुसर, अलिमाबाद, अनकवाडी, दापुरा, मारोडी, एकलारा, खोबरखेड, आपातापा, आखतवाडा, शामाबाद, सुल्तान आजमपूर, आपोती बुद्रूक, आपोती खुर्द, अंबिकापूर, मजलापूर, जलालाबाद, गोणापूर, रामगाव, गोंदापूर, दहिगाव, पळसो खुर्द, धोतर्डी, सांगळूद खुर्द, वरोडी, वाकी, नावखेड, सांगळूद बुद्रूक, कौलखेड गोमासे, कौलखेड, लाखोंडा बुद्रूक, लाखोंडा खुर्द या गावांचा समावेश आहे. 

टँकरचा वारेमाप खर्च वाचणार.आता त्या धरणातून खांबोरा योजनेतील ५५ पैकी ४४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. ४ कोटी १६ लाख ८३ हजार रुपये खर्चाचे अंदाजपत्रक आहे. ऑगस्टपासून आतापर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठय़ावर प्रचंड खर्च झाला आहे. त्यापुढे हा खर्च वाचवून पर्यायी उपाययोजना नव्या प्रस्तावातून तयार होणार आहे. 

४४ गावांना असा होईल पाणी पुरवठा २00४ मध्ये अकोला शहरापर्यंत आणलेल्या जलवाहिनीतून चोहोट्टा येथे पाणी आणले जाईल. त्या जलवाहिनीचा वापर करत ते ६४ खेडी योजनेच्या जलवाहिनीला जोडून घुसर येथे पुरवठा केला जाईल. तेथून विविध गावांना जोडणार्‍या जलवाहिन्यांतून ते गावांमध्ये पोहोचवले जाणार आहे. त्यासाठी जलवाहिन्यांची डागडुजी व काही प्रमाणात नवीन कामे केली जाणार आहेत.

टॅग्स :water transportजलवाहतूक