लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा ४५ क्विंटलचा साठा रविवारी महापालिका प्रशासनाने जप्त केला. मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.मनपा पूर्व झोन अंतर्गत गुड मार्निंंग पथकाद्वारे रविवारी हगणदरी भागाची तपासणी सुरू होती. दरम्यान, कॅरीबॅग विकणारा फेरीवाला दिसून आला. त्याच्याकडे ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा साठा आढळल्याने पथकातील कर्मचार्यांनी त्याला सदर पिशव्या कोठून आणल्यात याची माहिती विचारली. त्यावर फेरीवाल्याने तेलीपुरा चौकातील पवन बॅग हाउसचे नाव सांगितले. त्यानंतर मनपा आयुक्त अजय लहाने यांच्या कानावर ही बाब टाकली गेली. त्यानंतर मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या पथकाने प्रोप्रायटर लीलाराम जेठवाणी यांच्या पवन बॅग हाउस आणि गोडावूनची झाडाझडती घेतली. दोन गोडावूनमध्ये ५0 मायक्रॉन कॅरीबॅगचा मोठा साठा येथे सापडला. घटनास्थळावरून ४५ क्विंटल ८0 किलोग्रॅमचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सोमवारी संचालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत अकोला महानगरपालिका क्षेत्रात अस्वच्छता पसरविणार्या तसेच ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या बंदी असलेल्या कॅरीबॅग वापरात आणून कचरा व प्रदूषणास कारणीभूत ठरत आहेत. शहरात कुठे असे नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्यांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहनही महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. ही कारवाई क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, श्याम बगेरे, आरोग्य निरीक्षक संजय खोसे, प्रवीण खांबोरकर, सुरेश पुंड, शैलेश पवार, प्रशिष भातकुले, प्रशांत जाधव, कुणाल भातकुले यांनी केली.
प्लास्टिक पिशव्यांचा ४५ क्विंटलचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 2:55 AM
अकोला : ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा ४५ क्विंटलचा साठा रविवारी महापालिका प्रशासनाने जप्त केला. मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
ठळक मुद्देमहापालिका उपायुक्तांच्या नेतृत्वात कारवाईदोन गोडावूनमध्ये सापडला ५0 मायक्रॉन कॅरीबॅगचा मोठा साठा