अकोला : वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजनेंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींमार्फत ५ लाख ४० हजार ३५० वृक्ष लागवड करण्याचे नियोजन जिल्हा परिषदमार्फत निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून वृक्ष लागवडीसाठी ४ लाख ५७ हजार १२० खड्डे करण्यात आले असून, ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात १ जुलैपासून वृक्ष लागवड सुरू करण्यात आली आहे.वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजनेंतर्गत २०२० या वर्षात जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील सातही तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतींकडून १ हजार १० वृक्ष लागवडप्रमाणे ५३५ ग्रामपंचायती अंतर्गत ५ लाख ४० हजार ३५० वृक्ष लागवड करण्याचे नियोजन जिल्हा परिषदमार्फत निश्चित करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींकडून जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने ३० जुलैपर्यंत ग्रामपंचायतींकडून ४ लाख ५७ हजार १२० खड्डे तयार करण्यात आले आहेत. तयार केलेला खड्ड्यांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत वृक्ष लागवड करण्याचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे.
५.४० लाख वृक्ष लागवडीसाठी ४.५७ लाख खड्डे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 5:52 PM