अकोला: पश्चिम वºहाडात रिसोड विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचा दिशाभूल करणारा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना सोडली तर अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले. सायंकाळी ५ वाजतापर्यंत सरासरी ५५ टक्के मतदान झाले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला पूर्व मतदारसंघातील पोतदार हायस्कूल येथे सकाळी ९ वाजता मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, दिशाभूल करणाऱ्या संदेशाबाबत वंचित बहुजन आघाडीच्या रिसोड शहर अध्यक्षाने दिलेल्या तक्रारीवरू न सहा जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.पश्चिम वºहाडातील १५ विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली. तथापि, दुपारी १ वाजतापर्यंत मतदान संथगतीने झाले. ही आकडेवारी बघता जास्तीत जास्त ४५ ते ५० टक्के मतदान होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता; परंतु दुपारी ३ वाजतापर्यंत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. सायंकाळी ५ वाजतापर्यंत सरासरी ५५ टक्के मतदान झाले. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड व कारंजा विधानसभा मतदारसंघात अंदाजे ५७ टक्के मतदान झाले. विस्ताराने सर्वात मोेठा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, खामगाव, चिखली, सिंदखेड राजा, मलकापूर, मेहकर, जळगाव जामोद या सात मतदारसंघात ५८.८७ टक्के मतदान झाले. अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या पाच मतदारसंघात ५७.७ टक्के मतदान झाले होते.- ईव्हीएममध्ये बिघाडयाही निवडणुकीत अनेक ठिकाणी सुरुवातील ईव्हीएम यंत्रात बिघाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाला. अकोट विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम यंत्राच्या बिघाडामुळे मतदारांना मतदानासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आली.