पोहा (जि. वाशिम) : वढवी येथे ५0 ग्रामस्थांना डायरियाची लागण झाली असून त्यांच्यावर पोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. लग्नातील जेवण आणि दूषित पाण्यामुळे या डायरियाची लागण झाल्याचे सांगण्यात येते.वढवी येथे मंगळवारी गावात झालेल्या दोन लग्नसंमारंभात गावातील लोकांनी जेवण घेतले. त्यानंतर लहान मुलांसह जवळपास ५0 लोकांमध्ये डायरियाची लक्षणे दिसून आली. त्यापैकी २0 रुग्णांवर आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. आरोग्य केंद्राच्या पथकाने गावाला भेट देऊन विहिरींच्या पाण्याचे नमुने संकलित करून ते तपासणीसाठी जिल्हास्तरावरील प्रयोगशाळेत पाठविले आहेत.
वाशिम जिल्ह्यात डायरियाचे ५0 रुग्ण
By admin | Published: April 07, 2016 1:53 AM