शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

पातूर तालुक्यातील ११४ बचत गटांचे पन्नास लाख रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 1:08 AM

शिर्ला :  केंद्र सरकारच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बालकांना दिला जाणार्‍या पूरक पोषण आहाराचे पातूर तालुक्यातील ११४ बचत गटांचे गेल्या दहा महिन्यांपासून सुमारे पन्नास लाख रुपये अनुदान शासनाकडे रखडले आहेत.

ठळक मुद्देपोषण आहार योजना पातूर तालुक्यातील ११४ बचत गट अडचणीत!

संतोषकुमार गवई । लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला :  केंद्र सरकारच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बालकांना दिला जाणार्‍या पूरक पोषण आहाराचे पातूर तालुक्यातील ११४ बचत गटांचे गेल्या दहा महिन्यांपासून सुमारे पन्नास लाख रुपये अनुदान शासनाकडे रखडले आहेत.सन १९७५ला राज्यात केंद्र सरकारने कार्यान्वित करण्यात आलेल्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे बळकटीकरण आणि पुनर्रचना करून एप्रिल २0१७ नव्या स्वरूपात सदर योजना अकोलासह २0 जिल्ह्यात कार्यान्वित केली. तीव्र कमी वजनाच्या बालकासह सर्वसाधारण बालकांसाठी सदर पोषण आहार योजना बालविकास कार्यक्रमाची फलनिष्पत्ती साधण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. पातूर तालुक्यात  0ते ६ वयोगटात ११ हजार 0७९ बालक,0३ ते 0६ गटातील ३ हजार ९१५ बालक, ८७१ स्तनदा माता,८२३ गरोदर मातांना १२१ अंगणवाडी आणि १९ मिनी अंगणवाडी एकूण १४0 अंगणवाड्यातून ११४ बचत गटांच्या माध्यमातून प्रतिदिन प्रति लाभार्थी यांच्यासाठी सकस पूरक पोषण आहार दिला जातो. यासाठी शासन प्रतिदिन प्रति लाभार्थी बचत गटांना सहा रुपये मोबदला देते.गेल्या दहा महिन्यांपासून बचत गट स्वत: सकस पूरक आहार शिजवून रेडी टू इट या प्रणालीद्वारे प्रतिदिन प्रति लाभार्थींना अंगणवाडीत आणून देतात; मात्र शासनाने ११४ बचत गटांचे प्रतिमाह ५ लाख याप्रमाणे सुमारे दहा महिन्यांपासून एक छदाम बचत गटांना दिला नसल्याने अडचणीत आलेल्या गटांना आहार तरी कसा पुरवावा, असा यक्ष प्रश्न पडला आहे.

महाराष्ट्र शासनाकडे निधीची मागणी केली आहे. तरतूद झाल्यावर बचत गटांचे अन्न शिजवून देण्याचे प्रतिदिन प्रति लाभार्थी सहा रुपये अनुदान वितरीत करण्यात येईल. - योगेश जवादे, महिला व बाल विकास अधिकारी, जि.प.अकोला.

 

बचत गटांना प्रतिदिन प्रति लाभार्थी दिले जाणारे मोबदला निधीची मागणी वरिष्ठ स्तरावर गेल्या फेब्रुवारी २0१७ पासून केली जात आहे.- समाधान राठोड, महिला व बाल प्रकल्प विकास अधिकारी, पातूर.

 

आहार देण्यासाठी वाटाणे, तांदूळ, पोहे कांदे,मुरमुरे ,तेल मसाला आदी विकत आणण्यासाठी पैसे लागतात; मात्र शासनाने दहा महिन्यांपासून पैसेच दिले नाहीत. त्यामुळे आहार तरी कसा पुरवावा, असे संकट आम्हाला पडले आहे.- सुनीता अनिल गिर्हे, वटेश्‍वर महिला बचतगट, खानापूर.