अकोला, दि. 0९- जिल्हय़ातील रेती घाटांच्या लिलाव प्रक्रियेत एकूण घाटांपैकी पन्नास टक्के घाटांचा लिलाव रविवारी झाला. त्यातून महसूल विभागाला ६ कोटी ६६ लाख रुपये मिळाले; मात्र उर्वरित घाटांतून रेती माफिया अवैध उत्खनन करून विभागाला कोट्यवधींचा चुना लावण्याच्या तयारीत असल्याचे लिलाव प्रक्रियेतून दिसत आहे. रेती घाटांचा लिलाव करण्यासाठी जिल्हय़ात १२९ घाट आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली; मात्र त्यापैकी ६४ घाटांसाठीच निविदा प्राप्त झाल्या. प्राप्त निविदेनुसार ऑनलाइन लिलाव करण्यात आला. त्यामध्ये निविदाप्राप्त सर्वच घाटांचा लिलाव झाला. त्यापोटी महसूल विभागाला ६ कोटी ६६ लाख ६६ हजार ८८४ रुपये मिळाले. विशेष म्हणजे, मूर्तिजापूर तालुक्यातील सर्वच घाटांचा लिलाव झाला, तर पातूर, बाश्रीटाकळी व अकोट तालुक्यांतील एकाही रेती घाटासाठी निविदा आल्या नाहीत. त्यामुळे लिलावही झाला नाही. बाळापूर तालुक्यात मोठय़ा प्रमाणात असलेल्या रेती घाटांपैकी केवळ तीन घाटांचा लिलाव झाला. या तालुक्यातील घाटांमध्ये मोठय़ा प्रमाणात रेतीचे साठे आहेत; मात्र ते विकत न घेता अवैध उत्खनन करण्याचा सपाटा रेती माफियांकडून लावला जातो. त्यासाठीच लिलाव प्रक्रियेतून घाट घेण्यास विलंब करण्याचेही प्रकार घडतात. तालुका एकूण रेती घाटअकोला २८ १२बाळापूर २२ 0३मूर्तिजापूर ३0 ३0तेल्हारा २१ १९पातूर 0३ 00बाश्रीटाकळी १५ 00आकोट १0 00एकूण १२९ ६४उर्वरित रेती घाटांचा लिलाव करण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामध्ये पातूर तालुक्यातील घाटांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सोबतच शासनाला अपेक्षित महसूल मिळणार आहे. - डॉ. रामेश्वर पुरी, जिल्हा खणिकर्म अधिकारी, अकोला.
अकोला जिल्हय़ातील ५0 टक्के रेती घाटांचा लिलाव
By admin | Published: October 10, 2016 3:11 AM