नितीन गव्हाळे / अकोलाशिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के जागेवर मोफत प्रवेश देण्यात येतो. ही प्रवेश प्रक्रिया या वर्षीपासून ऑनलाइन करण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील ५0 शाळांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली. आर्थिक दुर्बल घटक प्रवेशासाठी ज्या शाळा नोंदणी करतील त्याच खासगी विनाअनुदानित शाळेत १ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणार्या पालकांच्या पाल्यांना प्रवेश मिळणार आहे. ५ एप्रिलपासून शाळांच्या ऑनलाइन नोंदणीस प्रारंभ झाला आहे. शाळांची नोंदणीची प्रक्रिया आटोपल्यानंतर पालकांना विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. त्याची तारीख अद्याप शिक्षण विभागाने जाहीर केली नाही. सद्यस्थितीत जिल्हय़ात केवळ २६ इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी नोंदणी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
*या घटकांना मिळणार प्रवेशएससी, एसटी, अपंग व इतर मागासवर्गीय घटकातील ज्यांचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळेत मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. शासकीय नियमाप्रमाणे या विद्यार्थ्यांची फी शासनाकडून शाळेला देण्यात येणार आहे.