अकोला- राज्यात १९९९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढविली होती. त्यावेळी विजयी उमेदवारांना मिळालेली मतं ३५ ते ५0 हजारांच्या घरात होती. आता १५ वर्षांंनंतर पुन्हा एकदा या दोन पक्षांसोबतच शिवसेना आणि भाजप हे युतीतील दोन पक्षही स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच जिल्ह्यात भारिप-बमसं या पक्षाचे उमेदवारही निवडणूक लढवित असल्याने जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात पंचरंगी लढतीचे तर काही मतदारसंघात तुल्यबळ अपक्षांमुळे बहुरंगी लढतीची शक्यता आहे. मतदारांच्या संख्येसोबतच उमेदवारांची संख्याही वाढली असल्याने १५ वर्षांपूर्वीचाच आकड्यांचा खेळ यावेळीही बघावयास मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून १९९९ मध्ये स्व तंत्र निवडणूक लढविली होती. त्यानंतरच्या निवडणुका या दोन पक्षांनी आघाडी करून लढल्यात. आता १५ वर्षांंची आघाडी फुटली. त्यामुळे स्वतंत्र लढत असलेल्या या दोन पक्षांसोबतच युतीतही फूट पडल्याने प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची संख्या यावेळी वाढली आहे. त्यासोबतच आकोट, बाळा पूर आणि मूर्तिजापूर या तीन मतदारसंघात लाखाच्यावर नवीन मतदारांची भर पडली असून, अकोला पश्चिम आणि अकोला पूर्व या दोन मतदारसंघातील सरासरी ६५ हजारांपेक्षा अधिक नावं मतदारांची नावे यादीत समाविष्ट झाली आहेत. मतदारांची संख्या वाढली असली तरी या मतांचे दावेदारही यावेळी वाढले आहेत. उमेदवारांची संख्या वाढल्याने विजय मिळविण्यासाठी आवश्यक मतांची सं ख्याही घटणार आहे. १९९९ मध्ये बोरगाव मंजू आणि अकोला वगळता इतर मतदारसंघात विजय मिळविणार्या उमेदवारांना ३५ ते ४0 हजारांच्या घरात मतं मिळाली होती. बोरगाव मंजूमध्ये भारिप- बमसंच्या तिकिटावर लढणारे डॉ. दशरथ भांडे यांनी ५१३२९ मतं मिळवून शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार विजय मालोकार यांच्याविरुद्ध १0 हजारांपेक्षा अधिक मताधिक्यांनी विजय मिळविला होता. तत्कालीन अकोला आणि आताच्या अकोला पूर्व मतदारसंघात १९९९ च्या निवडणुकीत गोवर्धन शर्मा यांनी ५१६४६ मतं मिळविली होती. यावेळी या पाचही मतदारसंघातील तुल्यबळ लढती बघता १९९९ च्या मतांचेच गणित पुन्हा दिसण्याची शक्यता आहे. १९९९ मध्ये एकत्र लढणारे शिवसेना व भाजपही यावेळी स्वतंत्र लढत आहेत. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बसपा, एमडीपी, सपा, रि पाइं आणि काही मतदारसंघात प्रबळ अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. त्यामुळे यावेळी विजयी उमेदवारांचे गणितं ४५ ते ५0 हजारांच्या घरातच राहण्याची दाट शक्यता आहे. मताधिक्याचा विचार केला तर अकोला आणि मूर्तिजापूर हे दोन मतदारसंघ वगळता इतर मतदारसंघा त विजयी उमेदवाराचे मताधिक्य सरासरी १0 हजारांच्या घरात होते. अकोला मतदारसंघातून गोवर्धन शर्मा यांना २५१५ तर मूर्तिजापूरमध्ये संजय धोत्रे यांना ४७00 मतांनी विजय मिळाला होता. आता २0१४ च्या निवडणुकीत सर्वच मतदारसंघात पंचरंगी लढती होणार आहेत. काही ठिकाणी बहुरंगी लढती होण्याची शक्यता आहे. १९९९ मध्ये काही मतदारसंघात दिग्गजांना निसटता विजय मिळाला होता. काही मतदारसंघात आताची परिस्थितीसुद्धा तशीच आहे.
५0 हजारात विजयाचा धनी!
By admin | Published: October 08, 2014 1:02 AM