अकोला: जिल्हयात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतीच असून, शासकीय आणि खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढतच आहे.
त्यामध्ये उपचार घेत असलेल्या जिल्हयातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी दररोज सरासरी ५०० रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करण्यात येत आहे.
जिल्हयात कोरोना विषाणूचा कहर सुरुच असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यूच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. रुग्णालयांत उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हयातील कोविड रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप करण्यात येत आहे. त्यामध्ये उपचार घेत असलेल्या जिल्हयातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी सद्यस्थितीत दररोज सरासरी ५०० रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करण्यात येत आहे.
जिल्हयात कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा जिल्हयातील कोविड रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. जिल्हयात सद्यस्थितीत दरदिवसाला कोरोनाबाधित रुग्णांसाठी सरासरी ५०० रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करण्यात येत आहे.
डाॅ. नीलेश अपार
उपविभागीय दंडाधिकारी, अकोला.