अकोला जिल्ह्यातील ५१ हजार विद्यार्थी देणार इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 10:49 AM
Akola News: परीक्षा केंद्रांवर कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
अकोला: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची २९ एप्रिल व बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिलपासून होणार आहे. अकोला जिल्ह्यातून यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षेला २६ हजार ९७७ विद्यार्थी तर इयत्ता बारावीच्या परीक्षेला २४ हजार ८०९ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, परीक्षा केंद्रांवर नियमावली लागू करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यात मुख्य केंद्रे १२१, उपकेंद्रे ३१८ राहणार आहेत. इयत्ता बारावी परीक्षेसाठी मुख्य केंद्रे ८५, उपकेंद्रे १८३ राहणार आहेत. जिल्ह्यात दहावी व बारावीची एकूण ७०७ परीक्षा केंद्रे राहणार आहेत. विभागीय शिक्षण मंडळाने अकोला जिल्ह्यातील दहावी, बारावी परीक्षांचे नियोजन केले आहे. शिक्षण मंडळाने कोरोनाच्या अनुषंगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे परीक्षा केंद्रांवर पालन होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. बारावी परीक्षांसाठी विभागातून परीरक्षक केंद्र, परीक्षा केंद्र, उपकेंद्र, परीक्षक, नियामक, वरिष्ठ नियामक आणि इतर कर्मचाऱ्यांबाबत नियोजन केले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा कोरोना काळात होत असल्याने, विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी व खबरदारी शिक्षण मंडळाला घ्यावी लागणार आहे. त्यानुसार उपाययोजना करण्यात येत आहेत. शिक्षक, शिक्षकांच्या कोरोना चाचणी करण्यात येत आहेत.असे आहेत, विद्यार्थीइयत्ता १० वी- २६,९७७ विद्यार्थीइयत्ता १२ वी- २४,८०९ विद्यार्थीपरीक्षा केंद्रे, उपकेंद्रे- ४३९ (दहावी)परीक्षा केंद्रे, उपकेंद्रे- २६८दहावी, बारावी परीक्षा कोरोना काळात होत असल्याने, परीक्षा केंद्रांवर खबरदारी घेण्यात येणार आहे. उपाययोजनासुद्धा करण्यात येत आहेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. ९० टक्के कोरोना चाचण्या झाल्या आहेत.-देवेंद्र अवचार, शिक्षणाधिकारी माध्यमिक