- संतोष येलकरअकोला: देश रक्षणाचे कर्तव्य बजावताना गेल्या ५२ वर्षांच्या कालावधीत अकोला जिल्ह्यातील १४ जवान शहीद झाले असून, वेगवेगळ्या युद्ध मोहिमेत या शहीद जवानांनी देशासाठी वीरमरण पत्करले आहे.जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४४ जवान शहीद झाले. शहीद जवानांना देशभरात मानवंदना अर्पण करण्यात येत असून, शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त होत आहेत. त्यानुषंगाने सैन्य दलात देश रक्षणाचे कर्तव्य बजावताना वीरमरण पत्करलेल्या जिल्ह्यातील जवानांची माहिती जाणून घेतली असता, १९६५ ते २०१७ या ५२ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील १४ जवान शहीद झाले. त्यामध्ये महार रेजिमेंट, मराठा रेजिमेंट, आर्टिलरी रेजिमेंटमधील जवानांचा समावेश आहे. १९६५ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्ध मोहिमेसह आॅपरेशन मेघदूत व आॅपरेशन रक्षक अशा वेगवेगळ्या युद्ध मोहिमेत जिल्ह्यातील १४ जवानांनी देशासाठी वीरमरण पत्करले.१९६५ ते २०१७ दरम्यान शहीद झालेले जवान!जिल्हा सैनिक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार १९६५ ते २०१७ या ५२ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील १४ जवान शहीद झाले. त्यामध्ये दुर्योधन झाबुजी सिरसाट, महादेव नामदेव तायडे, प्रल्हाद भोलाजी साव, आनंद सकाराम काळपांडे, हरिश्चंद्र पंढरी वानखडे, संतोष खुशाल जामनिक, भास्कर श्रीराम पातोंड, विजय बापूराव तायडे, विनोद यशवंत मोहोड, कैलाश काशीराम निमकंडे, प्रशांत प्रल्हाद राऊत, संजय सुरेश खंडारे, आनंद शत्रुघ्न गवई व सुमेध वामनराव गवई या शहीद जवानांचा समावेश आहे.जिल्ह्यात असे आहेत माजी सैनिक!तालुका माजी सैनिकअकोला ९३२अकोट २२५बाळापूर २८८मूर्तिजापूर २०६बार्शीटाकळी ९१तेल्हारा ८५पातूर १०८...........................................एकूण १९३५