शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १४६२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४१५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये तेल्हारा येथील पाच, रामदास पेठ येथील दोन, तर शिवाजी चौक, जठार पेठ, चिखलगाव, शिवनी, तुळजापूर (ता. पातूर), जीएमसी होस्टेल, जुने शहर, खेडकरनगर, बार्शीटाकळी, सिटी कोतवाली, केडिया प्लॉट, कुबेरनगर, खेताननगर, कौलखेड, बोरगाव मंजू, माळीपूर, मोठी उमरी, रतनलाल प्लॉट व कापशी तलाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी आलेल्या अहवालात स्वराज पेठ येथील चार, कॉटन मार्केट, अकोट, सिंधी कॅम्प, अकोट फैल, गो-रक्षण रोड येथील प्रत्येकी दोन, तर कळंबा बु. (ता. बाळापूर), ज्ञानखेड, उरळ, रामनगर, गजानन नगर, जीएमसी, डाबकी, जगजीवनराम नगर, आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
रॅपिड चाचण्यांमध्ये सहा पॉझिटिव्ह
शुक्रवारी झालेल्या एकूण १५० रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत २६,७३३ चाचण्यांमध्ये १८४९ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
नऊ जणांना डिस्चार्ज
शुक्रवारी सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून पाच अशा एकूण नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
७३१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९८३० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८७९८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ७३१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.