समाजाचे काही देणे लागते या धर्तीवर ‘लोकमत’ने पुढाकार घेत राज्यात दि. २ जुलै ते १५ जुलैपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित केले आहेत. त्यानुसार, रविवार, दि.११ जुलै रोजी माहेश्वरी भवन येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात युवकांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अशोक बिहाडे, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य तथा तालुका उपाध्यक्ष संजय अढाऊ, भाजपचे तालुका गजानन उंबरकार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रा. प्रदीप ढोले, माजी नगराध्यक्ष कांचनताई विखे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.अशोक तापडिया, प्रा. सुधाकर येवले, ॲड. गजानन तराळे, शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष अजय गावंडे, तालुका संघटक प्रवीण वैष्णव, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विकास पवार, भाजपचे युवाआघाडी जिल्हा सरचिटणीस किरण अवताडे, सचिव सुमित गंभिरे, विकास मंचचे राम फाटकर यांची उपस्थिती होती. शिबिरामध्ये जुने शहरातील अविनाश विखे मित्रमंडळ यांनी सहकार्य केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गावंडे, अनूप मार्के, विवेक खारोडे, न. प. अध्यक्ष जयश्री पुंडकर, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष नयनाताई मनतकार, शेतकरी पॅनलचे बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप खारोडे यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. ‘लोकमत’तर्फे तालुका प्रतिनिधी प्रशांत विखे यांनी सर्वांचे आभार मानले.
------------------
अनेकांचा झाला हिरमोड
कोविड-१९ची लस घेतल्यानंतर १५ दिवसानंतर रक्तदान करावे, अशी अट असल्याने अनेक युवक रक्तदान न करताच परतले. काही महिलांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी भरल्याने त्या सुद्धा रक्तदानापासून वंचित राहल्या.