अकोला: गतवर्षी जून ते आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाईपोटी ५ कोटी ५१ लाख ८९ लाख रुपयांचा मदतनिधी सोमवारी शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त १३ हजार ५४९ शेतकऱ्यांना या पीक नुकसान भरपाईच्या मदतीचा लाभ मिळणार आहे.गत जून ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पीक नुकसान भरपाईपोटी राज्यातील बाधित शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी १३९ कोटी १९ लाख १८ हजार रुपयांचा मदतनिधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा निर्णय गत १० जुलै २०१९ रोजी शासनामार्फत घेण्यात आला. गतवर्षी जून ते आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात १३ हजार ५४९ शेतकºयांचे ७ हजार ७२६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. पीक नुकसान भरपाईपोटी शेतकºयांच्या मदतीसाठी ५ कोटी ५१ लाख ८८ हजार रुपयांच्या मदतनिधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गत ३१ आॅक्टोबर रोजी शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुषंगाने गत जून ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाईपोटी ५ कोटी ५१ लाख ८८ लाख रुपयांचा मदतनिधी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध मदतनिधी तालुकास्तरावर तहसील कार्यालयांना वितरित करण्यात येणार असून, लवकरच मदतीची रक्कम संबंधित अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.तालुकानिहाय असे आहेत अतिवृष्टीग्रस्त शेतकरी!तालुका शेतकरीअकोला ३,०३१तेल्हारा ५६६बाळापूर २,७८०पातूर १००बार्शीटाकळी २,३४५मूर्तिजापूर ४,७२७...................................................एकूण १३,५४९