अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये एकूण मोठे, मध्यम व लघु असे ४४६ प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांमध्ये अमरावतीमधील उर्ध्व वर्धा, यवतमाळमधील पुस प्रकल्प, अरूणावली, बेंबळा, अकोलामधील काटेपूर्णा, वाण प्रकल्प तर बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी आणि खडकपूर्णा अशा १० प्रकल्पांचा समावेश आहे. यावर्षी पावसाळा चांगला झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. उन्हाळा सुरू असल्याने पाण्याचा वापर वाढला आहे. पावसाळ्याला आणखी पुढील दोन महिने बाकी आहे. सद्य:स्थितीत अमरावती विभागातील प्रकल्पांमध्ये ५५.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मोठ्या प्रकल्पांवर हजारो हेक्टर शेतीला सिंचनासाठी सुध्दा पाण्याचा उपयोग केला जाते. मागील वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे या प्रकल्पांमध्ये उन्हाळ्यातही पाण्याची पातळी टिकून आहे.
--बॉक्स--
विभागातील मोठ्या प्रकल्पांतील साठा
काटेपूर्णा
३७.८३ टक्के
वाण
४४.९६ टक्के
ऊर्ध्व वर्धा
६०.३६ टक्के
नळगंगा
९३.२८ टक्के
खडकपूर्णा
२३.८३ टक्के
पेनटाकळी
१०० टक्के
बेंबळा
४७.२४ टक्के
इसापूर
६३.०७ टक्के
--बॉक्स--
पाणीसाठ्यात झपाट्याने घट
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विभागाच्या प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. विभागातील लघु प्रकल्पांमध्ये ३६.२४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.