अकोला : विविध कामांनिमित्त जिल्ह्यात आल्यानंतर ‘लॉकडाउनमध्ये जिल्ह्यातील विविध भागांत अडकलेल्या ५ हजार ५८० नागरिकांना जिल्ह्याबाहेर त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत १५ मेपर्यंत ‘आॅनलाइन’ परवानगी देण्यात आली आहे.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाउन’मध्ये जिल्ह्यात विविध कामांसाठी जिल्ह्याबाहेरून आलेले नागरिक विविध भागांत अडकले होते. लॉकडाउनमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी आॅनलाइन परवानगी देण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनामार्फत गत आठ दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली. १५ मेपर्यंत जिल्ह्यात अडकलेल्या ५ हजार ५८० नागरिकांना जिल्ह्याबाहेर त्यांच्या गावी जाण्याकरिता जिल्हा प्रशासनामार्फत आॅनलाइन परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाउनमध्ये जिल्ह्यातील विविध भागांत अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.परराज्यातील १,४७३ मजुरांना पाठविले गावी!‘लॉकडाउन’मध्ये जिल्ह्यातील विविध भागांत अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये १५ मेपर्यंत १ हजार ४७३ मजुरांना संबंधित राज्यातील त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.जिल्ह्यात विविध कामानिमित्त आलेल्या मात्र ‘लॉकडाउन’मध्ये अडकलेल्या ५ हजार ५८० नागरिकांना जिल्ह्याबाहेर त्यांच्या गावी जाण्यासाठी आॅनलाइन परवानगी देण्यात आली आहे.- संजय खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी.