संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: थकबाकीदार शेतकर्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजाणीत जिल्हय़ातील १८ राष्ट्रीयीकृत बँकांकडून अखेर शनिवारी थकबाकीदार शेतकर्यांची माहिती जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आली. त्यानुसार जिल्हय़ात राष्ट्रीयीकृत बँकांचे दीड लाख रुपयांपर्यंत थकबाकीदार असणारे ५७ हजार १0७ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत.राज्यातील थकबाकीदार शेतकर्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात २८ जून रोजी शासन निर्णय काढण्यात आला. त्यानुसार १ एप्रिल २0१२ ते ३0 जून २0१६ पर्यंत थकबाकीदार असलेले शेतकरी दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. दरम्यान, कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवून, सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत थकबाकीदार शेतकर्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्याचा निर्णय शासनामार्फत गत ५ जुलै रोजी घेण्यात आला. त्यानुसार कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत कर्जमाफीसाठी पात्र ठरणार्या जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्हय़ातील राष्ट्रीयीकृत बँकांना गत ३0 जून रोजी दिले होते. त्यानुसार २२ पैकी १८ राष्ट्रीयीकृत बँकांकडून प्राप्त झालेली थकबाकीदार शेतकर्यांची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांनी १५ जुलै रोजी जिल्हाधिकार्यांकडे सादर केली. त्यानुसार५७ हजार १0७ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत.जिल्हा बँकेचे १९ हजारावर थकबाकीदार शेतकरी पात्र!कर्जमाफी योजनेत सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्यांची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत गत ५ जुलै रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्यात आली. त्यानुसार बँकेचे जिल्हय़ात थकबाकीदार असलेले १९ हजार ८५३ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. या थकबाकीदार शेतकर्यांकडे १८ कोटी ८९ लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे.थकबाकीदार शेतकरी! दीड लाख रुपयांपर्यंत : ५७,१0७दीड लाखांपेक्षा जास्त : ४,११६जिल्हय़ातील राष्ट्रीयीकृत १८ बँकांकडून प्राप्त माहितीनुसार, बँकांचे जिल्हय़ात दीड लाख रुपयांपर्यंत ५७ हजार १0७ थकबाकीदार शेतकरी असून, ते कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र ठरतील. चार राष्ट्रीयीकृत बँकांकडून थकबाकीदार शेतकर्यांची माहिती प्राप्त नाही. प्राप्त माहितीची पडताळणी केल्यानंतर शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.- आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी
राष्ट्रीयीकृत बँकांचे ५७ हजार शेतकरी ठरणार कर्जमाफीसाठी पात्र!
By admin | Published: July 16, 2017 2:36 AM