शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

विदर्भात २८ दिवसांत वीज ग्राहकांकडून ५७६ कोटींचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 5:57 PM

576 crore payment from electricity consumers : मागील २८ दिवसांत विदर्भातील वीज ग्राहकांनी सुमारे ५७६ कोटी रुपयांच्या वीज बिलांचा भरणा केला.

ठळक मुद्देथकबाकी वसुली मोहिमेला गती प्रादेशिक संचालकांनी घेतला आढावा

अकोला : थकबाकी मिळवण्याच्या अभियानाला वेग आला असून मागील २८ दिवसांत विदर्भातील वीज ग्राहकांनी सुमारे ५७६ कोटी रुपयांच्या वीज बिलांचा भरणा केला.

नागपूर परिक्षेत्रात घरगुती,वाणिज्यिक,औद्योगिक आणि कृषी ग्राहकांकडील महावितरणची थकबाकी मोठया प्रमाणात वाढली आहे. ग्राहकांकडील वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या निर्देशनात या महिन्याच्या सुरुवातीपासूनच व्यापक मोहीम संपूर्ण विदर्भात राबविण्यात येत आहे. या मोहिमेला अधिक गती देण्यासाठी स्वतः प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी अकोला, अमरावती व नागपूर परिमंडला आढावा बैठकी घेतल्या. अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे महावितरणच्या थकबाकी वसुली मोहिमेत १ जून ते २८ जून या दरम्यान नागपूर परिक्षेत्रात थकबाकीदार ग्राहकांनी सुमारे ५७६ कोटी रुपयांच्या वीज बिलांचा भरणा केला. उर्वरित ग्राहकांनी वीज बिलाची थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी केले आहे.

 

परिमंडळ निहाय असा झाला भरणा

परिमंडळ                   देयक भरणा (कोटीमध्ये)

नागपूर                        २५४

अमरावती                   १०५

अकोला                          ९१

चंद्रपूर                           ७०

गोंदिया                        ५६

००००००००००००००००००००

एकूण                     ५७६

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkolaअकोला