लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असले तरी, ७ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील ८३ हजार २२४ शेतकºयांना ६७४ कोटी ९६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असून, जिल्ह्यातील उर्वरित ५९ हजार २७६ शेतकºयांना अद्याप पीक कर्ज मिळाले नाही. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना १ हजार १४० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात २६ एप्रिलपासून बँकांमार्फत शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे काम सुरू करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असून, जिल्ह्यातील खरीप पेरण्यादेखील आटोपल्या असताना, कर्ज वाटपाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ७ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील ८३ हजार २२४ शेतकºयांना ६७४ कोटी ९६ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.जिल्ह्यातील उर्वरित ५९ हजार २७६ शेतकºयांना अद्याप पीक कर्ज मिळाले नाही. त्यामुळे पीक कर्जाच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज केव्हा मिळणार आणि खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बँकनिहाय पीक कर्ज वाटपाचे असे आहे वास्तव!जिल्ह्यात ७ आॅगस्टपर्यंत ८३ हजार २२४ शेतकºयांना ६७४ कोटी ९६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत २६ हजार ६९० शेतकºयांना २४९ कोटी ६४ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ४६ हजार ३९१ शेतकºयांना ३३२ कोटी ५७ लाख रुपये व ग्रामीण बँकेमार्फत १० हजार १४३ शेतकºयांना ९२ कोटी ७३ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ८३ हजार २२४ शेतकºयांना ६७४ कोटी ९६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्यातील संबंधित बँकांना देण्यात आले आहेत.- आलोक तारेणीया, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.