जिल्हाभरातून येथील ठोक भाजीबाजारात शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतात व विविध जिल्ह्यांतील व्यापारी हा माल घेऊन जातात. बुधवारी रात्री दहापर्यंत पावसाचा जोर कमी असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणला होता; मात्र रात्रभर धो धो पाऊस झाल्याने बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर साडेचार फुटांपर्यंत पाणी भरले होते. त्यामुळे रात्री तीन वाजता हर्राशीच्यावेळी भाजीपाला व्यापाऱ्यांना बाजारात जाता आले नाही. परिणामी, भाजीपाल्याची हर्राशीही होऊ शकली नाही. त्यामुळे ६० ते ७० क्विंटल शेतमाल बाजारातच पडून आहे. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
भाजीपाल्याची वाहने निघाली नऊ वाजता
येथील भाजी बाजारातून अमरावती, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विविध वाहनांद्वारे भाजीपाला पोहोचविला जातो. रस्त्यामध्ये पाणी भरल्याने सकाळी पाच वाजता माल घेऊन इतर जिल्ह्यात पोहोचणारी ही वाहने सकाळी नऊ वाजता बाजारातून निघाली. त्यामुळे भाजीपाला पोहोचविण्यास उशीर झाला.