अकोला: शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची ६0 हेक्टर ६८ आर जमीन महसूल प्रशासनामार्फत सोमवारी भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या ताब्यात देण्यात आली. यामध्ये इमारतींचादेखील समावेश आहे. अकोल्यातील शिवणी विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची गुडधी व शिवर शिवारातील ६0. ६८ हेक्टर जमीन ताब्यात घेऊन भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या ताब्यात देण्याचा आदेश शासनामार्फत गत सप्टेंबरमध्ये जिल्हाधिकार्यांना देण्यात आला होता. त्यानुसार कृषी विद्यापीठाची संबंधित जमीन जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार शासनाच्या नावे करण्यात आली. शासनाच्या नावे करण्यात आलेली कृषी विद्यापीठाची जमीन सोमवार, २३ मे रोजी भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या नागपूर येथील निदेशक कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आली. जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या आदेशानुसार अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) एम.डी.शेगावकर, तहसीलदार राजेश्वर हांडे, भूमी अभिलेख विभागाच्या तालुका निरीक्षक सारिका कडू यांनी विमानतळ विस्तारीकरणासाठी कृषी विद्यापीठाची ६0 हेक्टर ६८ आर जमीन भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या ताब्यात दिली. भारतीय विमानतळ प्राधिकरणचे नागपूर येथील निदेशक रोशन कांबळे यांच्याकडे त्यांनी जमिनीची ताबा पावती दिली. यावेळी कृषी विद्यापीठाचे उपकुलसचिव एस.के.अहेरकर व विद्यापीठाच्या सामान्य प्रशासन विभागाचे डी.बी.भोंडे आणि संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.
६0 हेक्टर जमीन विमानतळ प्राधिकरणच्या ताब्यात!
By admin | Published: May 24, 2016 1:40 AM