संतोष येलकर / अकोला: ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या कामांसाठी निधी उपलब्ध असूनही जिल्ह्यात ६0 पाणीपुरवठा योजनांची कामे अपूर्ण आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ग्राम पाणीपुरवठा समित्यांकडून पाणीपुरवठा योजनांची कामे अद्यापही पूर्ण करण्यात आली नाही. योजनांची कामे रखडलेली असल्याने, संबंधित गावांमधील ग्रामस्थांना पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणी केव्हा उपलब्ध होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत गत तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील ६0 गावांमध्ये ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांकडून ग्राम पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू करण्यात आली. पाणीपुरवठा योजनांच्या कामांसाठी आवश्यक असलेला निधीदेखील जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ग्राम पाणीपुरवठा समित्यांना वितरित करण्यात आला. निधी उपलब्ध असताना जिल्ह्यातील सातही तालुक्यात ५0 ग्राम पाणीपुरवठा योजनांची कामे गेल्या तीन वर्षांपासून अद्याप पूर्ण करण्यात आली नाही. ९0 टक्के काम पूर्ण झालेल्या या पाणीपुरवठा योजनांची चाचणी घेण्याचे काम रखडले असून, पाणीपुरवठा योजना सुरू होणे बाकी आहे. तसेच गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये १0 पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू करण्यात आली असली तरी, या योजनांची कामे पूर्ण होणे बाकी असल्याची स्थिती आहे. तीन वर्षांंपासून जिल्ह्यात एकूण ६0 पाणीपुरवठा योजनांची कामे अपूर्ण असल्याच्या स्थितीत, संबंधित गावांमध्ये ग्रामस्थांना या पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणीपुरवठय़ाची सुविधा उपलब्ध नाही. पाणीपुरवठा योजनांची कामे रखडलेलीच असल्याने, या योजनांद्वारे ग्रामस्थांना पाणी केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.ग्राम पाणीपुरवठा समित्यांची उदासीनता!पाणीपुरवठा योजनांच्या कामांसाठी निधी उपलब्ध असताना तीन वर्षांपासून संबंधित ग्राम पाणीपुरवठा समित्यांकडून पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हय़ात ६0 ग्राम पाणीपुरवठा योजनांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे ग्राम पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्याच्या कामात ग्राम पाणीपुरवठा समित्यांची उदासीनता स्पष्ट होत आहे. चाचणीअभावी अपूर्ण असलेल्या योजनांची कामे! कामे सुरू असलेल्या योजना!तालुका कामे तालुका कामेअकोला ११ अकोला 0३आकोट 0६ आकोट 0१बाळापूर 0६ बाळापूर 0२बाश्रीटाकळी 0३ बाश्रीटाकळी 0२मूर्तिजापूर १0 मूर्तिजापूर 0१तेल्हारा 0९ तेल्हारा 0१पातूर 0५एकूण ५0 एकूण १0
६0 पाणीपुरवठा योजनांची कामे अपूर्ण
By admin | Published: July 06, 2015 1:38 AM