अकोला, दि. १९- खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पुरवठा करण्यासाठी अखेर पाटबंधारे विभागामार्फत महान येथील काटेपूर्णा धरणातून 0.८0 दशलक्ष घनमीटर पाणी रविवारी सायंकाळी काटेपूर्णा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे ६४ गावांमधील जलसंकट टळले आहे. गत जुलैमध्ये पावसाच्या पाण्याने खांबोराजवळील उन्नई बंधारा भरला होता. त्यामुळे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत उन्नई बंधार्यातून ६४ गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला; परंतु ९ सप्टेंबर रोजी उन्नई बंधार्यातील पाणी संपले. त्यामुळे गत १२ सप्टेंबरपासून ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद झाला होता. पाणीपुरवठा बंद झाल्याने पावसाळ्यातच ६४ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. ग्रामस्थांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याची मागणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अकोला उपविभाग कार्यालयामार्फत अकोला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडे करण्यात आली होती. त्यानुषंगाने ६४ गावांसाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी केव्हा सोडण्यात येणार, याबाबत ग्रामस्थांकडून प्रतीक्षा करण्यात येत आहे. याबाबतचे वृत्त गत १४ सप्टेंबर च्याह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत पाटबंधारे विभागामार्फत ६४ गावांना महानच्या काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी अखेर १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पाटबंधारे विभागामार्फत महान येथील काटेपूर्णा धरणातून 0.८0 दशलक्ष मीटर पाणी काटेपूर्णा धरणात सोडण्यात आले. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने, ६४ गावांमध्ये निर्माण झालेले जलसंकट टळले आहे.
६४ गावांना महान धरणातून पाणी सोडले!
By admin | Published: September 20, 2016 1:27 AM