- संतोष येलकर
अकोला: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत दीड वर्षापूर्वी ‘आॅफलाइन’ अर्ज सादर केलेल्या जिल्ह्यातील ६ हजार ५९१ शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची रक्कम शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे ‘आॅफलाइन’ अर्ज सादर केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा रकमेचा लाभ मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०१७ या वर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा काढण्यासाठी ‘आॅनलाइन’ अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतर, शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील शेतकºयांचे ‘आॅफलाइन’ अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यामध्ये जिल्ह्यातील ६ हजार ५९१ शेतकºयांनी पीक विम्यासाठी सादर केलेले ‘आॅफलाइन’ अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारण्यात आले होते. आॅफलाइन अर्ज सादर केलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गत जुलैमध्ये शासनाकडे सादर करण्यात आली होती. तसेच पीक विम्याचा लाभ देण्यासाठी निधी मागणीचा प्रस्तावदेखील शासनाकडे सादर करण्यात आला होता. ‘आॅफलाइन’ अर्ज सादर केल्यानंतर दीड वर्षांचा कालावधी उलटून गेला; मात्र पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याने, पीक विम्याचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात असताना, अखेर ‘आॅफलाइन’ अर्ज सादर केलेल्या राज्यातील शेतकºयांसाठी ६९ कोटी ४८ लाख रुपये पीक विम्याची रक्कम शासनामार्फत मंजूर करण्यात आल्याचा आदेश कृषी आयुक्तालयामार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला १५ फेबु्रवारी रोजी प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील आॅफलाइन अर्ज केलेल्या शेतकºयांसाठी मंजूर करण्यात आलेली पीक विम्याची रक्कम शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आॅफलाइन अर्ज सादर केलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना पीक विम्याचा लाभ मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.तालुका शेतकरीअकोला ११७३अकोट १६५९तेल्हारा ७६०बाळापूर ६६९पातूर ११४३बार्शीटाकळी ७४६...............................................एकूण ६५९११० कोटींची रक्कम मिळणार?पीक विमा योजनेंतर्गत आॅफलाइन अर्ज केलेल्या जिल्ह्यातील ६ हजार ५९१ शेतकºयांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी १० कोटी रुपये निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कृषी आयुक्तालयासह शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार आॅफलाइन अर्ज सादर केलेल्या शेतकºयांसाठी पीक विम्याची रक्कम प्राप्त होण्याची शक्यता आहे.