सुनील काकडे / वाशिम ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही शासकीय आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी शासनाचे सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातून आरोग्यविषयक प्रभावी सोयी-सुविधा पुरविल्या जात असून, याअंतर्गत २0१३-१४ व २0१४-१५ या दोन वर्षांतील प्रलंबित ६७ कोटी ८0 लाख ६७ हजार रुपयांच्या अनुदानास राज्य शासनाने २३ फेब्रुवारीला मान्यता दर्शविली आहे. ग्रामीण भागातील गरीब, दुर्लक्षित व गरजू रुग्णांना कार्यक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याकरिता केंद्र शासनाने एप्रिल २00५ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले. त्याचाच पुढचा भाग म्हणून सन २0१३ पासून या अभियानाच्या माध्यमातून शहरी भागातही आरोग्यविषयक सोयी-सुविधा पुरविल्या जात आहेत. ह्यराष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानह्ण या नावाने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमांतर्गत २0१३-१४ व २0१४-१५ या दोन वर्षांकरिता केंद्राचा ७५ टक्के व राज्य शासनाचा २५ टक्के हिस्सा निर्धारित करण्यात आला होता. त्यानुसार, राज्याने २0१३-१४ चा ३२ कोटी ४ लाख ६७ हजार आणि २0१४-१५ चा ३५ कोटी ७६ लाख असा एकूण ६७ कोटी ८0 लाख ६७ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.शहरी झोपडपट्टय़ांमध्ये हजारो लोक राहतात. या भागात आरोग्याच्या अनेक समस्या असतात. एखादा आजार पसरला, तर त्याची त्वरित शेकडोंना लागण होते. या निधीमुळे झोपडपट्टी भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी ६७.८0 कोटींचा निधी!
By admin | Published: February 25, 2016 1:33 AM