तालुक्यातील पारद, भटोरी, मंगरुळ कांबे, गोरेगाव, लाखपुरी, सिरसो, दुर्गवाडा, सांगवी, टिपटाळा, हिरपूर, कवठा (खोलापूर), सोनोरी (बपोरी), बपोरी, कुरूम, माटोडा, कवठा (सोपीनाथ), धामोरी बु, काली, राजुरा घाटे, खांदला, धानोरा (पाटेकर), निंभा, विराहीत, मोहखेड, कंझरा, अनभोरा, जामठी बु, हातगाव, चिखली या २९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवरी रोजी होऊ घातली आहे. यासाठी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर या आठ दिवसांत नामांकन दाखल करण्याची मुदत होती. शेवटच्या दिवशी अखेर ९६ प्रभागासाठी ६८३ नामांकन प्राप्त झाले आहेत, यामध्ये पारद सदस्य संख्या ७, उमेदवारी अर्ज २५, भटोरी ९-२५, मंगरुळ कांबे ९-२१, गोरेगाव ९-२२, लाखपुरी ११-३७, सिरसो १३-५४, दुर्गवाडा ७-१९, सांगवी ७-१३, टिपटाळा ७-१३, हिरपूर ११-३७, कवठा (खोलापूर) ७-१४, सोनोरी (बपोरी) ७-७, बपोरी ७-१६, कुरूम १५-४२, माटोडा ७-१६, कवठा (सोपीनाथ) ७-१४, धामोरी बु. ७-२०, कार्ली ७-१४, राजुरा घाटे ७-१७, खांदला ७-१३, धानोरा (पाटेकर) ७-१४, निंभा ९-३३, विराहीत ७-२३, मोहखेड ७-८, कंझरा ९-१७, अनभोरा ९-१९, जामठी बु ११-२९, हातगाव १३-६८, चिखली ९-२४, या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६८३ एवढे नामांकन शेवटच्या दिवसापर्यंत दाखल झाले. यात तरुण व नवीन चेहऱ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सर्वात जास्त हातगाव या ग्रामपंचायतीसाठी ६८ अर्ज तर सर्वात कमी सोनोरी बपोरी ७ सदस्य निवडीसाठी ७ नामांकन दाखल करण्यात आले आहे. सोनोरी बपोरी येथे ७ सदस्य निवडीसाठी सातच अर्ज दाखल झाल्याने ही आणि मोहखेड येथे ७ सदस्य निवडीसाठी ८ नामांकन प्राप्त झाल्याने तालुक्यातील या दोन ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे
२४९ सदस्यांसाठी २९ ग्रामपंचायतींमधून ६८३ नामांकन दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:19 AM