मनपाच्या स्थायी समिती सभागृहात बुधवारी वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक संपन्न झाली. सभेमध्ये माजी महापौर विजय अग्रवाल, मनपा वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष तथा मनपा उपायुक्त वैभव आवारे, नगरसेवक तथा समिती सदस्य तुषार भिरड, पोलीस उपनिरीक्षक टी.के.काटे, क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते, दिलीप जाधव, देवीदास निकाळजे, वृक्षप्रेमी देवेंद्र तेलकर, उदय वझे, नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता मनोज घाटोळकर आदिंची उपस्थिती होती. यावेळी पूर्व, पश्चिम आणि दक्षिण झाेन भागातील एकुण ६९ वृक्षांच्या कटाईवर चर्चा करण्यात आली. यामध्ये कडुनिंब, आंबा, बाभळी, सागवान, चाफा, पिंपळ, गुलमोहर, महारूख, बाभुळ, कडु बादाम, बेल, शेवगा, अशोक, भिंगरी, उंबर आदि वृक्षांचा समावेश आहे. चर्चेअंती अतिआवश्यक झाडे कपात करण्यासाठी परवानगी देण्यात आली. तसेच उरलेल्या झाडांचे पुन्हा सर्व्हेक्षण करून त्या संदर्भातील अहवाल पुढच्या सभेमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
शहरात ६९ वृक्षांची हाेणार कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:20 AM