शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

७० वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, अकोल्यातील धक्कादायक घटना 

By आशीष गावंडे | Published: May 29, 2024 8:05 PM

दुचाकीवरुन साेडून देण्याचा बहाना; सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

अकाेला : दुचाकीवरून सोडून देण्याचा बहाना करून एका ७० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याची संताप जनक घटना २८ मे राेजी दुपारी दाेन वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील बोरगाव मंजू परिसरातील शेतशिवारात घडली. वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी तीन अज्ञात इसमांविराेधात गुन्हा दाखल केला असून आरोपी ३० ते ३५ वर्षे वयोगटातील असल्याचा अंदाज आहे. दरम्यान,घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या पथकाने राष्ट्रीय महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्याची माहिती आहे. 

अकोला बस स्थानकावरून ७० वर्षीय वृद्ध महिला ही २८ मे राेजी दुपारी एसटी बसने मुर्तिजापूरलगतच्या दाळंबी गावाला जाण्यासाठी निघाली होती. दुपारी सुमारे दाेन वाजता दाळंबी गावात जाण्यासाठी ही महिला राष्ट्रीय महामार्गावर बसमधून उतरली. तेथून गावच्या रस्त्याने पायी जात असताना त्यावेळी अज्ञात तीन इसम दाेन दुचाकीने आले आणि गावात सोडून देतो, असं सांगत तिला वाहनावर बसवले. निर्मनुष्य असलेल्या रस्त्यालगतच्या एका लिंबाच्या शेतशिवारात नेऊन या तीघांपैकी एका युवकाने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी वृद्ध महिलेला देण्यात आली. 

यादरम्यान गावातील दोन व्यक्ती रस्त्यावरून जात असताना वृद्ध महिलेला दिसले असता तिने आरडाओरड केली. आवाज कानावर पडताच त्या दोन्ही व्यक्तींनी शेताकडे धाव घेतली. त्यावेळी अत्याचार करणाऱ्या युवकाने घटनास्थळावरुन पळ काढला. मदतीसाठी गेलेल्या त्या दोघांनी पीडित महिलेला तिच्या घरी नेले. महिलेने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबियांनी बोरगाव मंजू पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. तसेच या प्रकरणी तक्रार नोंदवली असता, पोलिसांनी अज्ञात तीन जणांविराेधात भादंवि कलम ३७६, ३४ नुसार गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. 

पाेलिसांनी घटनास्थळाची केली पाहणीबाेरगाव मंजू पाेलिस स्टेशनचे पाेलिस निरीक्षक मनोज केदारे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक सतीष सपकाळ, संतोष निंबेकर, योगेश काटकर, सचिन सोनटक्के, महिला पोलिस कर्मचारी वनिता चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. तसेच रात्री वृध्द महिलेची जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली.  जिल्हा पाेलिस अधीक्षकांनी दिले निर्देशदरम्यान, घडलेल्या घटनेची जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक शंकर शेळके यांना सखाेल तपास करण्याचे निर्देश दिले. त्यानुषंगाने पोलिस पथके गठीत करण्यात आले असून ‘एलसीबी’चे पाेलिस निरीक्षक शंकर शेळके, पोलिस निरीक्षक मनोज केदारे, ‘पीएसआय’ गाेपाल जाधवसह कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. पाेलिसांकडून मंगळवारी रात्रभर शोध मोहीम राबविण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ