अकोला : गत २० वर्षांपासून केवळ नागपुरातच होत असलेला अपूर्व विज्ञान मेळावा कुतूहल संस्कार केंद्रातर्फे यंदा प्रथमच अकोल्यात आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्याच्या पहिल्या दिवशी शहरातील विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे धडे गिरविले. शहरातील ‘आईची शाळा’ या ठिकाणी रविवार व सोमवार अशी दोन दिवस हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे.सुरेश अग्रवाल यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा अपूर्व विज्ञान मेळावा केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. विद्यार्थ्यांना छोट्या-छोट्या गोष्टींमधून विज्ञानाची उकल करून दाखवून या विषयाबाबत गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने सुरू असलेला हा मेळावा कुतूहल संस्कार केंद्राने अकोल्यात आयोजित केला आहे. या मेळाव्यात विज्ञानाच्या विविध प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. या प्रतिकृतींमागील विज्ञानाची ओळख व्हावी, यासाठी शनिवारी दिवसभर सुरेश अग्रवाल व त्यांच्या चमूने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. दिवसभरात तब्बल ७०० विद्यार्थ्यांनी मेळाव्याला भेट देऊन विज्ञानाचे धडे गिरविले. रविवार व सोमवार अशी दोन दिवस हे प्रदर्शन सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी येणाºयांना वैज्ञानिक प्रतिकृतींबाबत प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी माहिती देणार आहेत. विज्ञानप्रेमी नागरिक व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.यांनी दिले प्रशिक्षणशनिवारी विद्यार्थ्यांना सुरेश अग्रवाल व त्यांच्या चमूने प्रशिक्षण दिले. यामध्ये पूजा मुळे , एकलव्य फौंडेशन, हुशंगाबाद, मध्यप्रदेश, साक्षी राय, बनारस, उत्तरप्रदेश, सुहास उदापुरकर, चेतन माहुलकर, वैजयंती पाठक, कुतूहल, अकोला यांचा समावेश आहे.